वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोविड -19 चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही माहिती त्यांच्या व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी दिली. 10 दिवसांपूर्वी अध्यक्ष ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी ट्रम्प यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह - donald trump news
10 दिवसांपूर्वी अध्यक्ष ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी ट्रम्प यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिली.
यापूर्वी व्हाईट हाऊसचे फिजीशियन सीन कॉनली यांनी शनिवारी रात्री अध्यक्ष ट्रम्प यांच्यापासून कोणालाही कोरोनाचा धोका नसल्याचे सांगीतले होते. ते सार्वजनिक जीवनात परत येऊ शकतात. गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून राष्ट्राध्यक्षांना ताप आला नाही. डॉक्टरांच्या टीमने अध्यक्ष ट्रम्प यांचे कोविड -19 चा उपचार पूर्ण केले आहेत, अशी माहिती सीन कॉनली यांनी दिली होती.
ट्रम्प यानां 2 ऑक्टोबरला कोरोनाची लागन झाल्याचे समजले होते. या शनिवारी त्यांना 10 दिवस पूर्ण झाले. त्यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत 'मला बरे वाटत असून आता निवडणूकीसाठी मेळावे घ्यायचे आहेत, असे म्हटले आहे. ट्रम्प त्यांच्या पहिल्या सभेसाठी सोमवारी फ्लोरिडाला रवाना झाला.