महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

नागरिकांना देणार मोफत कोरोना लस ; अमेरिकन सरकारने आखली योजना - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकन लोकांना कोरोनाची लस विनामूल्य उपलब्ध करुन देण्यासाठी ट्रम्प सरकारने बुधवारी एका व्यापक योजनेची रूपरेषा आखली. सत्तेत कमबॅक करण्यासाठी कोरोनाच्या लसीची घोषणा करण्यास ट्रम्प आतूर झाले आहेत.

अमेरिका
अमेरिका

By

Published : Sep 16, 2020, 9:30 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकन लोकांना कोरोनाची लस विनामूल्य उपलब्ध करुन देण्यासाठी ट्रम्प सरकारने बुधवारी एका व्यापक योजनेची रूपरेषा आखली आहे. फेडरल हेल्थ एजन्सीज आणि संरक्षण विभागाने जानेवारीत किंवा शक्यतो या वर्षाच्या उत्तरार्धात लसीकरण मोहिमेसाठी योजना आखल्याची माहिती आहे.

कोरोना लस वितरणामध्ये पेंटॅगॉन सहभागी आहे. लस वितरणाची ही मोहिम मोठी असणार आहे. सुरवातीला कोरोना लस डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे कर्मचारी, राष्ट्रीय वैद्यकीय अकादमी यांना पुरवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात नागरिकांना लस देण्यात येईल.

दरम्यान, ट्रम्प सरकारला लोकांनी जास्त पंसती दिली नसल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. ट्रम्प सरकारने अमेरिकेतील आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी कोरोना लस उपलब्ध करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून यांनी पूर्ण यंत्रणा लसीच्या कामात झोकून दिली आहे. सत्तेत कमबॅक करण्यासाठी कोरोनाच्या लसीची घोषणा करण्यास ट्रम्प आतूर झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details