महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिका निवडणूक : अशी पार पडली उपाध्यक्षीय वादविवाद फेरी! - अमेरिका निवडणूक २०२०

US election 2020: Kamala Harris and Mike Pence face off in vice presidential debate
उपाध्यक्षांचा वादविवाद : 'कोरोना महामारी'पासून चर्चेची सुरुवात..

By

Published : Oct 8, 2020, 7:04 AM IST

Updated : Oct 8, 2020, 9:07 AM IST

08:33 October 08

निवडणूक!

यानंतर डोनाल्ड ट्रम्प किंवा जोई बायडेन यांच्यापैकी कोणी निवडून आल्यास, अमेरिकेत कशा प्रकारे विकास होईल असा प्रश्न दोघांनाही विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी आपापली मते व्यक्त केली. 

08:27 October 08

श्वेत वर्चस्व

अमेरिकेतील श्वेतवर्णीय गाजवत असलेल्या वर्चस्वाबाबत कमला यांनी ट्रम्पवर निशाणा साधला. देशातील लोकांमध्ये समानता निर्माण व्हावी याबाबत ट्रम्प काहीच करत नसल्याचे त्या म्हणाल्या.

07:57 October 08

अमेरिकेतील वर्णद्वेष आणि हिंसाचार

कमला यांनी जॉर्ज फ्लॉईड आणि ब्रेओन्ना टेलर यांच्याबाबत बोलताना, दोघांनाही न्याय न मिळाल्याचे म्हटले. तर पेन्स यांनी अमेरिकेतील कायदा व्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचे मत व्यक्त केले.

07:56 October 08

गर्भपात कायदा

अमेरिकेतील गर्भपात कायदा आणि सर्वोच्च न्यायालयातील पदभरती याबाबत चर्चा करण्यास मॉडरेटरने सुचवले होते. मात्र, पेन्स हे अमेरिकेचे लष्कर आणि आयसिसबाबतच बोलत राहिले.

07:53 October 08

अमेरिकेचे परराष्ट्र धोरण

अमेरिका-चीन व्यापार मुद्द्यावरुन अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी कमला यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील समस्यांना ट्रम्प जबाबदार असल्याचे म्हटले. अमेरिकेने आपल्या कित्येक मित्र राष्ट्रांची साथ गमावत, जगातील हुकूमशाहांना सोबत घेतले असल्याची टीका त्यांनी केली. तसेच इराण अणुकरार काढून टाकण्यावरुनही त्यांन ट्रम्पवर निशाणा साधला. तर पेन्स यांनी अमेरिकेचे लष्कर आणि आयसिस या दहशतवादी संघटनेवर अमेरिकेने केलेल्या कारवाईचा मुद्दा रेटला.

07:51 October 08

अमेरिका-चीन व्यापार युद्ध

अमेरिका-चीन व्यापाराचा मुद्दा चर्चेला येताच वातावरण पेटले. यावेळी पेन्स यांनी ट्रम्प यांच्या चीनविषयी घेतलेल्या निर्णयांची पाठराखण केली, तर बायडेन यांच्या चीनबाबत असलेल्या मतांवर त्यांनी आक्षेप नोंदवला. तर, कमला यांच्यामते चीनसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेतील बऱ्याच उत्पादक कंपन्या बंद पडल्या आहेत. 

07:48 October 08

हवामान बदल आणि वणवे

यानंतर हवामान बदल आणि जंगलातील वणव्यांसंबंधी चर्चा करण्यात आली. यादरम्यान कमला यांनी सध्याचे सरकार हे विज्ञाननिष्ठ नसल्याचा आरोप केला. हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यासंबंधी हे सरकार काहीच करत नसल्याचे त्या म्हणाल्या. तर, पेन्स यांनी आपण यावर अक्षय्य उर्जास्त्रोतांचा वापर आणि संसाधनांचा योग्य वापर करत उपाययोजना करत असल्याचे म्हटले.

07:47 October 08

अमेरिकेतील आरोग्यव्यवस्था

अमेरिकेतील आरोग्यव्यवस्थेबाबत बोलताना उपाध्यक्ष पेन्स यांनी 'ओबामाकेअर' या योजनेवर निशाणा साधला. ही योजना म्हणजे खरेतर आपत्ती होती असे मत त्यांनी व्यक्त केले.

07:45 October 08

अमेरिकेची अर्थव्यवस्था

यानंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. कोरोना काळात अमेरिकेतील करोडो लोकांचे रोजगार गेले आहेत, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही जबर झटका बसला आहे.

07:41 October 08

बिडेन आणि ट्रम्प यांच्या राजकीय नोंदी

अमेरिकेतील मतदारांना ट्रम्प आणि बिडेन यांच्या राजकीय नोंदी जाणून घेण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न यावेळी दोन्ही उमेदवारांना विचारण्यात आला. यावर कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या कराचा मुद्दा उपस्थित केला. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदी असताना केवळ ७५० डॉलर्स टॅक्स भरल्याचे उघड झाले आहे. मात्र, पेन्स यांनी त्यावर उत्तर देत सांगितले, की ट्रम्प हे एक उत्तम व्यावसायिक आहेत आणि त्यांनी आपल्या अनेक उद्योग-व्यापारामधून लाखो डॉलर्स कर भरला आहे.

07:01 October 08

'कोरोना महामारी'पासून चर्चेची सुरुवात..

वादविवादाची सुरुवात कोरोना महामारीच्या विषयाने करण्यात आली. मॉडरेटर क्रिस्टन वेल्कर यांनी अमेरिकेतील कोरोना बळींच्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला. यामध्ये कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला, तर पेन्स यांनी ट्रम्पच्या निर्णयांची पाठराखण केली. पेन्स म्हणाले, की चीनमधून येणाऱ्या लोकांवर बंदी घालणारा अमेरिका हा पहिलाच देश होता.

07:01 October 08

उपाध्यक्षांचा वादविवाद : 'कोरोना महामारी'पासून चर्चेची सुरुवात..

वॉशिंग्टन - कोरोना विषाणूचा प्रसार जगभर झाला असताना अमेरिकेत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज उपाध्यक्ष पदाचे उमेदवार कमला हॅरीस आणि माईक पेन्स यांच्यात साल्ट लेक सिटीमधील उटाह शहरात वादविवाद फेरी होत आहे. या फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्या मुद्द्यांवरून पेन्स-हॅरीस एकमेकांची कोंडी करणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Oct 8, 2020, 9:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details