सॅनफ्रान्सिस्को - अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असले तरी ट्विटरने अमेरिकेच्या अध्यक्षांचे असलेले पोटस युएस हे ट्विटर अकाउंट अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार असलेले जो बिडेन यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
पोटस युएस या ट्विटर अकाउंटला ३२.८ दशलक्ष लोक अनुसरण (फॉलो) करतात. सध्या, ट्रम्पच्या प्रशासनाने केलेले ट्विट या अकाउंटवर दिसतात. जो बिडेन यांच्याकडे ट्विटर अकाउंट दिल्यानंतर पुन्हा शून्य ट्विट करून अकाउंट दिले जाणार आहे.
व्हाईट हाऊसचे ट्विटर खाते आणि इतर अमेरिकन सरकारचे ट्विटर खाते २० जानेवारीला जो बिडेन यांच्या टीमकडे देण्यात येणार आहे. या वृत्ताला ट्विटरच्या प्रवक्त्याने पुष्टी दिली आहे. ट्विटरचे प्रतिनिधी बिडेन-हॅरिस यांच्या टीमशी भेट घेऊन सरकारी खात्यांचे हस्तांतरण कसे करणार होणार आहे, याची माहिती देणार आहेत.
हेही वाचा-लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदला 10 वर्षांची शिक्षा
दरम्यान, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बिडेन यांचा विजय झाल्याचे बहुतांश माध्यमांनी म्हटले आहे. कारण, त्यांना २७० हून जागांवर विजय मिळाला आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पराभव अद्याप स्वीकारला नाही. मतमोजणी प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा दावा करत त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
हेही वाचा-जगातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 5 कोटींचा टप्पा; तर 13 लाख बळी
अमेरिकेच्या कायद्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे नावे राज्यांना ८ डिसेंबरपर्यंत द्यावी लागणार आहेत. कायदेशीर वाद असल्यास १४ डिसेंबरला अध्यक्षपदाचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
बिल गेट्स यांनी नव्या टीमचे केले स्वागत
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी अमेरिकन अध्यक्षांचे नाव न घेता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या टीमचे कौतुक करताना ट्रम्प यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या टीममध्ये साथीच्या काळात सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांना रोखणारे किंवा विरोध करणारे कोणतेही बाह्य घटक नाहीत, असे गेटस् यांनी म्हटले आहे.