महाराष्ट्र

maharashtra

मेक्सिकोमध्ये कोसळधार! भूस्खलन आणि पूरात 27 लोकांचा मृत्यू

By

Published : Nov 10, 2020, 6:29 PM IST

'येथे इतका विक्रमी पाऊस यापूर्वी कधी झाला नव्हता. मी गेल्या 50 वर्षांत असा पाऊस तबास्कोमध्ये कधीही झाल्याचे पाहिले नाही. सुदैवाने, आता पाऊस थांबला आणि पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता नाही,' अशी माहिती अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज यांनी सोमवारी माध्यमांना दिल्याचे वृत्त सिन्हुआने दिले आहे.

मेक्सिकोमध्ये कोसळधार
मेक्सिकोमध्ये कोसळधार

मेक्सिको सिटी -मेक्सिकोच्या चियापास आणि तबास्को येथे भीषण पूरानंतर आतापर्यंत 27 लोक मरण पावले आहेत आणि हजारो लोक विस्थापित किंवा बेघर झाले आहेत.

'येथे इतका विक्रमी पाऊस यापूर्वी कधी झाला नव्हता. मी गेल्या 50 वर्षांत असा पाऊस तबास्कोमध्ये कधीही झाल्याचे पाहिले नाही. सुदैवाने, आता पाऊस थांबला आणि पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता नाही,' अशी माहिती अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज यांनी सोमवारी माध्यमांना दिल्याचे वृत्त सिन्हुआने दिले आहे.

हेही वाचा -व्हिएतनाममधील मोलावे वादळामध्ये 27 ठार, 50 बेपत्ता

राष्ट्रीय नागरी संरक्षण समन्वयानुसार, चियापासमध्ये 22 लोक मरण पावले आणि 32 शहरांमध्ये 16 हजार लोक प्रभावित झाले. तबास्को येथे वादळामुळे 5 लोक ठार झाले आणि 8 शहरांमधील 1,48,000 हून अधिक लोक प्रभावित झाले.

'चियापास राज्याच्या उत्तरेस तबास्को सीमेवर मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे नद्यांचा पूर आला आणि दोन्ही राज्यांत पूर आला,' असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

मेक्सिकन सरकारने बाधित भागाचे संरक्षण व मदत करण्यासाठी संरक्षण व नौदल मंत्रालयांकडून 4,300 पेक्षा जास्त सैनिकांना तैनात केले आहे.

हेही वाचा -फिलिपाईन्समध्ये गोनी चक्रीवादळातील मृतांचा आकडा वाढून 16 वर

ABOUT THE AUTHOR

...view details