महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 1, 2020, 9:33 AM IST

Updated : Oct 1, 2020, 2:02 PM IST

ETV Bharat / international

#USELECTION : विजय आमचाच...पहिल्या चर्चासत्रानंतर ट्र्म्प यांचा दावा

अमेरिकी अध्यक्षपदासाठी जो बिडन यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळाली असून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीतर्फे रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांच्या दरम्यान मंगळवारी(28 सप्टेंबर) पहिले 'डिबेट' म्हणजेच पहिले सार्वजनिक चर्चा सत्र पार पडले. यावेळी जो बिडन कमी पडल्याची टीका ट्रम्प यांनी केली. अर्थात या चर्चेनंतर दोघांनी आपल्या प्रबळ उमेदवारीचा शंख फुंकला आहे.

US Presidential debate
#USELECTION : विजय आमचाच...पहिल्या चर्चासत्रानंतर ट्र्म्प यांचा दावा

वॉशिंग्टन -नोव्हेंबर महिन्यात पार पडणाऱ्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दंड ठोकले असून काल पार पडलेल्या पहिल्या चर्चासत्रात आपणच वरचढ ठरल्याचा दावा त्यांनी केला आहे.

येत्या नोंव्हेंबर महिन्यात अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी निवडणूक पूर्व वादविवाद कार्यक्रम पार पडतो. यामध्ये दोन्ही पक्षातील उमेदवारांमध्ये सार्वजनिक चर्चासत्र पार पडते. यंदा अमेरिकी अध्यक्षपदासाठी जो बिडन यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळाली असून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीतर्फे रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांच्या दरम्यान मंगळवारी पहिले 'डिबेट' म्हणजेच पहिले सार्वजनिक चर्चा सत्र पार पडले. यावेळी जो बिडन कमी पडल्याची टीका ट्रम्प यांनी केली. अर्थात या चर्चेनंतर दोघांनी आपल्या प्रबळ उमेदवारीचा शंख फुंकला आहे.

बुधवारी व्हाइट हाऊसवर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पहिल्या चर्चा सत्रात आपणच वरचढ ठरल्याचे सांगितले. तसेच ओहिओत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात स्वत:चा विजय झाल्याचे त्यांनी म्हटले. आर्थात, दोन्ही उमेदवारांनी स्वत:च्या विजयाचा डंका वाजवला आहे.

Last Updated : Oct 1, 2020, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details