महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकात यशस्वीपणे पोहोचले स्पेसएक्स कंपनीचे ड्रॅगन यान - International Space Station

डग हर्ली आणि बॉब बेहेन्किन हे अंतराळवीर स्पेस स्टेशनवर गेले आहेत. स्पेसएक्स ड्रॅगन यान कोणत्याही मदतीशिवाय स्वयंचलितपणे स्थानकाशी जोडले गेले.

स्पेसएक्स ड्रगन
स्पेसएक्स ड्रगन

By

Published : May 31, 2020, 9:09 PM IST

Updated : May 31, 2020, 9:47 PM IST

वॉशिंग्टन डी. सी. - अमेरिकेतील अंतराळ क्षेत्रातील खासगी स्पेसएक्स या कंपनीचे ड्रॅगन यान आंतराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर सुरक्षित पोहोचले. या यानाने नाव स्पेसएक्स ड्रॅगन असे असून दोन अंतराळवीर यातून स्पेस स्टेशनवर गेले आहेत. स्पेसएक्स ही एलॉन मस्क यांची खासगी कंपनी असून याद्वारे अंतराळात यशस्वीरित्या पोहोचण्यात यश आले आहे.

डग हर्ली आणि बॉब बेहेन्किन हे अंतराळवीर स्पेस स्टेशनवर गेले आहेत. स्पेसएक्स ड्रॅगन यान कोणत्याही मदतीशिवाय स्वयंचलितपणे स्थानकाशी जोडले गेले. खासगी क्षेत्रातील अंतराळयान निर्मित करणाऱ्या कंपनीने 20 वर्षांनी प्रथमच हे काम केले आहे.

नासानेदेखील या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. भविष्यात चंद्र आणि मंगळावरही जाण्याची शक्यता दृष्टीक्षेपात येत असल्याचे म्हटले आहे. केनेडी स्पेस स्टेशनवरून फाल्कन 9 रॉकेटने ड्रॅगन यानाचे प्रक्षेपण झाल्यानंतर 19 तासातंच यान आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले.

Last Updated : May 31, 2020, 9:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details