महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

South Korean Diplomat Beaten : न्यूयॉर्कमध्ये एका दक्षिण कोरिया राजनयिकाला मारहाण ; फोडले नाक - New York latest news

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात (New York City of America) हेट क्राईमचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. न्यूयॉर्क शहराच्या (New York City) रस्त्यावर एका दक्षिण कोरियाच्या राजनयिकाला मारहाण करण्यात करुन त्याचे नाक फोडण्यात आले आहे.

New York City Police
New York City Police

By

Published : Feb 11, 2022, 5:31 PM IST

न्यूयॉर्क सीटी : न्यूयॉर्क सिटीमध्ये (New York City) एका दक्षिण कोरियाच्या राजनयिकावर रस्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. घटनेत राजनयिकाला त्याला मारहाण करुन (South Korean diplomat beaten) त्याचे नाक फोडले आहे. यामुळे सार्वजनिक सुरक्षेतील घट आणि शहरातील सतत वाढणाऱ्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना रात्री 8:10 वाजता मिडटाउन मॅनहॅटनमधील फिफ्थ अव्हेन्यू आणि वेस्ट 35 स्ट्रीट परिसरात 911 कॉलवरून हल्ल्याची माहिती मिळाली. तिथे पोहचल्यानंतर त्यांना एक 52 वर्षीय आढळून आला, ज्याला मारहाण झाल्याने वेदना होत होत्या आणि चेहरा सुजला होता. न्यूयॉर्क शहराच्या पोलीस (New York City Police) विभागाच्या माहितीनुसार पीडित दक्षिण कोरियाचा एक राजनयिक आहे.

तपासानंतर अधिकाऱ्यांना समजले की, एका अज्ञात व्यक्तिने पीडितावर हल्ला केला आणि सिक्सथ एवेन्यूच्या दिशेने पैदल पळून गेला. पोलिसांनी एबीसी न्यूजला सांगितले की, ही घटना विनाकारण घडली होती. पोलीस म्हणाले, पीडिताला वेदना होत असल्याने त्याला रुग्णवाहिकेद्वारे ब्रुकलिनचे एनवाययू लँगोन हॉस्पिटलला (Brooklyn NYU Langone Hospital) घेऊन जाण्यात आले. पोलीस म्हणाले तपास सुरु आहे आणि या प्रकरणात अजून कोणाला ही अटक करण्यात आलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details