महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेतील अलाक्सामध्ये विमान अपघात, 7 जणांचा मृत्यू - अलाक्सामध्ये विमान अपघात

अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी दोन विमानांची टक्कर झाल्याने अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. मृतामध्ये प्रादेशिक सभासद गॅरी नॉप यांचा समावेश आहे.

विमान अपघात
विमान अपघात

By

Published : Aug 1, 2020, 11:12 AM IST

वॉशिंग्टन डी. सी -अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी दोन विमानांची टक्कर झाल्याने अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये प्रादेशिक सभासद गॅरी नॉप यांचा समावेश आहे. अलास्का प्रांतातील प्रायद्वीपातील विमानतळाजवळ ही घटना घडली.

अमेरिकेत हवेत दोन विमानांची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान यापूर्वी अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी दोन विमानांची टक्कर झाली होती. तेव्हा पाच जणांचा मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details