महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

वॉशिंग्टनमध्ये पूरस्थिती : रस्ते बनले नद्या, व्हाईट हाऊसमध्येही शिरले पाणी - flood

पोलिसांनी वाहनचालकांना वाहने न चालवण्याचा इशारा दिला आहे. व्हाईट हाऊसच्या तळघरामधील वेस्ट विंग येथे पाणी आले आहे. मात्र, व्हाईट हाऊसमध्ये पाणी शिरले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वॉशिंग्टनमध्ये पूरस्थिती

By

Published : Jul 9, 2019, 9:22 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये जोरदार पावसामुळे अचानकपणे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर पाणी आल्यामुळे रस्ते नद्या बनले आहेत. पोलिसांनी वाहनचालकांना वाहने न चालवण्याचा इशारा दिला आहे. तसेच, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या तळघरातही (बेसमेंट) पाणी साचले आहे. हवामान विभागाने आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

माँटेगोमेरी कौंटी, ईस्ट-सेंट्रल लौडौन कौंटी, अर्लिंग्टन कौंटी, फॉल्स चर्च आणि ईशान्य फेअरफॅक्स कौंटी येथे पुराचे पाणी साठले आहे. स्थानिक वेळेनुसार, दुपारी पावणेदोन वाजता हीच स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. व्हाईट हाऊसच्या तळघरामधील वेस्ट विंग येथे पाणी आले आहे. मात्र, व्हाईट हाऊसमध्ये पाणी शिरले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मंगळवार, बुधवारी पाऊस उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गुरुवारी जोरदार वारा आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील आवड्यात आर्द्रता कमी राहण्याची तसेच, आठवड्याच्या शेवटी हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details