वॉशिंग्टन - पुलवामा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक होता. आम्ही या हल्ल्यासंदर्भात माहिती घेत आहोत. यासंदर्भात बरेच अहवाल आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन अमेरिका लवकरच आधिकृत प्रतिक्रिया जाहीर करेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवानांना हौतात्म्य आले होते.
पुलवामा दहशतवादी हल्ला ‘अत्यंत भयानक’ - डोनाल्ड ट्रम्प - पुलवामा
यासंदर्भात बरेच अहवाल आमच्यापर्यंत पोहचले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन अमेरीका लवकरच आधिकृत प्रतिक्रीया जारी करेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत. ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकत्र येऊन दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न करावा. अमेरिकेचे भारताला पूर्ण समर्थन असून या हल्ल्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास पाकिस्तानला सांगितले असल्याचेही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता रॉबर्ट पालाडि यांनी म्हटले आहे.