दहशतवादी संघटनांवर कारवाई करा, अमेरिकेने पाकिस्तानला तीव्र शब्दात खडसावले - Jaish
भारत - पाक सीमेवर काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. हा तणाव लष्करी कारवाईतून सोडवता येणार नसून यामुळे संघर्ष वाढू शकते. दोन्ही देशांनी त्यांच्यातील प्रश्न चर्चेतून सोडवावे असे अमेरिकेकडून एएनआय या वृत्तसंस्थेला सांगण्यात आले आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेकडून आज पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारला तीव्र शब्दात खडसावण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी. शिवाय भारतासोबत असलेला सीमा संघर्ष चर्चेतून सोडवावा, असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले आहे.
भारत - पाक सीमेवर काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. हा तणाव लष्करी कारवाईतून सोडवता येणार नसून यामुळे संघर्ष वाढू शकते. दोन्ही देशांनी त्यांच्यातील प्रश्न चर्चेतून सोडवावे असे अमेरिकेकडून एएनआय या वृत्तसंस्थेला सांगण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी आम्ही पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी चर्चा केली आहे. सिमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल अशा कुठलाही कारवाईला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन पाकिस्तानला केले असल्याचे माइक पोम्पिओ यांनी म्हटले होते.
बुधवारी पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले होते. पाकिस्तानी वायुदलाचे लढाऊ विमान राजौरी परिसरात आणि नौशेरा सेक्टरपर्यंत आले होते. मात्र, भारतीय वायुसेनेच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला. या कारवाई दरम्यान, पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरले असून भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार, असे पाककडून म्हणण्यात आले होते. त्यावरुन हि कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.