वॉशिंग्टन- अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा दहशतवादासाठी करण्यात येऊ नये, हे निश्चित करण्याची गरज आहे. तेथील परिस्थितीचा वापर कोणत्याही देशाने स्वार्थासाठी करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन व पाकिस्तानला लगावला आहे. ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्रात बोलत होते.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तर राष्ट्राच्या महासभेत दहशतवाद, कोरोना महामारी, लसीकरण आदी विषयांबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की प्रतिगामी विचारांनी काही देश दहशतवादाचे राजकीय साधन म्हणून वापरत आहेत. त्यांच्यासाठी दहशतवाद हा मोठा धोका आहे. जगभरात कट्टरतावादाचा धोका वाढत आहे.
हेही वाचा-काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, यापुढेही असेल; संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्त्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी महासभेत काय म्हणाले?
- जगभरातील लस कंपन्यांना आमंत्रित करत आहे. भारतात येऊन कंपन्यांनी लशींचे उत्पादन घ्यावे. गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग हे 100 वर्षांमधील सर्वात मोठ्या महामारीचा सामना करत आहे. अशा भयंकर महामारीत प्राण गमाविलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करत आहे.
- ज्या देशाला लोकशाहीची माता म्हटले जाते, त्या देशाचे मी प्रतिनिधीत्व करतो. आमची विविधता आणि बळकट लोकशाही ही आमची ओळख आहे. 12 हून विविध भाषा, बोलीभाषा, विविध आहार आणि वेशभूषा आहेत. शक्तीशाली लोकशाहीचे हे उदाहरण आहे.
- रेल्वे स्टेशनवर वडिलांना टी स्टॉलवर मदत करणारा लहान मुलगा आज भारताचा चौथ्यांदा भारताचा पंतप्रधान होऊन महासभेत बोलत आहे. ही लोकशाहीची खरी ताकद आहे. भारतामध्ये एकाच दिवसात कोट्यवधी कोरोना लस देऊन कोविन डिजीटल प्लॅटफॉर्म मदत करत आहे.
- प्रदुषित पाणी हा भारतच नाहीत तर संपूर्ण जगाचा विशेषत: गरीब आणि विकसनशील देशांमधील मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठे अभियान राबवित आहोत. जगभरात पहिली डीएनए लस ही भारतात तयार करण्यात आली आहे. ही लस 12 वर्षांहून कमी वयोगटाच्या मुलांनाही देता येते.
हेही वाचा-शुक्रवारी पार पडली क्वाडची बैठक; इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मुक्त व्यापाऱ्याला प्रोत्साहन देण्याचा केला पुर्नउच्चार