वॉशिंग्टन - कोरोना विषाणूचा प्रसार जगभर झाला असताना अमेरिकेत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही पहिल्या वादविवाद स्पर्धेनंतर कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, आज (बुधवार) उपाध्यक्ष पदाचे उमेदवार कमला हॅरिस आणि माईक पेन्स यांच्यात साल्ट लेक सिटीमधील उटाह शहरात वादविवाद फेरी होणार आहे.
अमेरिका निवडणूक : कोविड नियमावलीचे पालन करत होणार उपाध्यक्षपदाची वादविवाद फेरी - कमला हॅरीस माईक पेन्स
उपाध्यक्षपदाचे उमेदवार कमला हॅरिस आणि माईक पेन्स यांच्यात साल्ट लेक सिटीमधील उटाह शहरात वादविवाद फेरी होणार आहे. मात्र, या विवाद फेरीवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे दोन्ही उमेदवारांच्या मध्ये प्लेक्सिग्लास (प्लास्टिकचे संरक्षक कवच) बसविण्यात येणार आहे. कमला हॅरीस ह्या डेमॉक्रटिक पक्षाच्या उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार असून अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्या रनिंगमेट (उपाध्यक्षपदाचा उमेदवार) आहेत. तर माईक पेन्स हे रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.
वादविवाद फेरीचे काम पाहणाऱ्या आयोगाने कोरोनापासून सुरक्षा घेण्याच्या उपायांना मंजुरी दिली आहे. उमेदवारांसोबतच परीक्षण अधिकाऱ्यांच्यामध्येही संरक्षण कवच बसविण्यात येणार आहे. आरोग्यविषयक उपाययोजना करण्याचे काम एका रुग्णालयाला देण्यात आले आहे. दोन्ही उमेदवारांमधील अंतर ७ फूटावरून १३ फुटांपर्यंत वाढविण्यात आले आहे. १५ ऑक्टोबराला अध्यपदासाठीचे दुसऱ्या वादविवादाची फेरी प्रस्तावित आहे. त्यावेळी प्लास्टिकचे संरक्षक कवच वापण्यास काहीच अडचण नसल्याचे पेन्स यांनी स्पष्ट केले.