न्यूयॉर्क - आपल्या महासागरांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी काल व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धानासाठी ऑस्ट्रेलियाने काय पावले उचलली आहेत? हे देखील स्पष्ट केले.
हवामान बदलासंबंधी चर्चेमध्ये बोलताना, जगातील नेत्यांनी आणि स्टेकहोल्डर्सनी तरुणांच्या समस्या ऐकाव्यात, असे आवाहनही मॉरिसन यांनी केले. यासोबतच त्यांनी महासागरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली.