न्यूयॉर्क : पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आयएसआय आणि अल कायदाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला. त्यावर, भारताचे पंतप्रधान (मोदी) त्याला सांभाळून घेतील असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.
संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात मोदी आणि ट्रम्प यांनी एक बैठक घेतली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्युस्टनला उपस्थित राहिल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. तर, ट्रम्प यांनी लवकरच भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारी करार होणार असल्याचे जाहीर केले.
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अल कायदा या दहशतवादी संघटनेला प्रशिक्षण दिले असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता, मोदी ती गोष्ट सांभाळून घेतील असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तसेच, माझा विश्वास आहे की पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान खान जेव्हा एकमेकांशी भेटतील आणि बोलतील, तेव्हा त्या भेटीतून बर्याच चांगल्या गोष्टी बाहेर येतील असेही ट्रम्प म्हटले.
मोदी म्हणजे 'फादर ऑफ इंडिया'...भारत आधी अनेक तुकड्यांमध्ये विखुरला गेला होता. ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबातील वडिल ज्याप्रमाणे कुटुंबाला एकत्र आणतो, त्याप्रमाणे मोदींनी देशाला एकत्र आणले. त्यामुळे आपण त्यांना 'फादर ऑफ इंडिया' म्हणू शकतो. असे ट्रम्प यांनी म्हटले.