महाराष्ट्र

maharashtra

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविषयी सर्वकाही

अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष होणारे जो बायडेन हे तिसऱ्या प्रयत्नाअंती या पदावर पोहोचले आहेत. 50 वर्षांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवलेत. ओबामा प्रशासनात सलग दोन वेळा अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.

By

Published : Jan 20, 2021, 2:59 PM IST

Published : Jan 20, 2021, 2:59 PM IST

Updated : Jan 20, 2021, 4:19 PM IST

ETV Bharat / international

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविषयी सर्वकाही

कोण आहेत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन?
कोण आहेत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन?

डेमॉक्रॅटिक पक्षाचे दीर्घकाळ सदस्य राहिलेले जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. 1972 मध्ये सीनेटवर निवडून जात सर्वात कमी वयाचा सीनेटर होण्याचा विक्रम त्यांनी केला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे पाच दशके ते अमेरिकेच्या राजकारणात सक्रीय आहेत. 50 वर्षांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवलेत. ओबामा प्रशासनात सलग दोन वेळा अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले.

तिसऱ्या प्रयत्नानंतर राष्ट्राध्यक्ष बनले

बायडेन 1988 मध्ये सर्वप्रथम अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले होते. मात्र साहित्यचोरीच्या आरोपानंतर त्यांनी यातून माघार घेतली. यानंतर 2008 मध्येही ते राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला.

ओबामा प्रशासनात महत्वाची भूमिका

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या प्रशासनात सलग दोन वेळा बायडेन उपराष्ट्रपती राहिले. त्यांच्या नेतृत्वात अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये बायडेन यांची महत्वाची भूमिका राहिलीय. ओबामा यांच्यासोबत त्यांचे अतिशय निकटचे संबंध राहिलेत.

बायडेन यांची राजकीय कारकीर्द

  • 20 नोव्हेंबर 1942 मध्ये पेनसिल्वेनियाच्या स्क्रॅन्टनमध्ये बायडेन यांचा जन्म झाला.
  • डेलावेअर विद्यापीठ आणि सिराकुस विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले.
  • 1970 मध्ये सर्वप्रथम न्यू कॅसल कौंटीचे कौंसिलर म्हणून ते निवडून आले.
  • 1972 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी बायडेन सर्वप्रथम डेलावेअरमधून सीनेटवर निवडून गेले.
  • यासोबतच ते अमेरिकेच्या इतिहासातील सहावे सर्वात कमी वयाचे सीनेटर ठरले.
  • 1987 ते 1995 दरम्यान सीनेटच्या न्यायिक समितीचे नेतृत्व त्यांनी केले.
  • बायडेन हे अमेरिकेच्या सीनेटवर सहा वेळा निवडून गेलेत.
  • 1973 ते 2009 या कालावधीदरम्यान सीनेटमध्ये डेलावेअरचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.
  • 2009 मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
  • ओबामा प्रशासनात सलग दोन वेळा त्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा कार्यभार सांभाळला.
  • 2017 मध्ये राष्ट्राध्यक्ष ओबामांनी त्यांचा प्रेसिडेन्शीयल मेडल देऊन सन्मान केला.
  • 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केली.
  • 2020 मधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांचा मोठ्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला.

बायडेन यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार

  • 1972 मध्ये सीनेट निवडणुकीतील विजयाच्या एकाच महिन्यानंतर बायडेन यांच्या पत्नी आणि मुलीचा अपघाती मृत्यू झाला.
  • या अपघातात त्यांची दोन्ही मुले ब्यु आणि हन्टर गंभीर जखमी झाले.
  • दोन्ही मुले रुग्णालयात असतानाच बिडेन यांनी सीनेटरपदाची शपथ घेतली.
  • पत्नी आणि मुलीच्या मृत्यूची घटना त्यांच्यासाठी मोठी धक्कादायक होती.
  • 1988 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या मेंदूवर दोन शस्त्रक्रीया झाल्या.
  • 2015 मध्ये त्यांचा मोठा मुलगा ब्यु बिडेनचा मेंदूच्या कर्करोगाने मृत्यू झाला.
  • यानंतर बायडेन यांची राजकीय कारकिर्द काही काळासाठी स्थगित झाली.
  • मात्र पाच वर्षांनंतर बायडेन यांनी दमदार पुनरागमन करीत राष्ट्रपतीपद निवडणुकीत मोठा विजय संपादन केला.

हेही वाचा -कोण आहेत बायडेन प्रशासनातील 'भारतीय' योद्धे; वाचा एका क्लिकवर..

Last Updated : Jan 20, 2021, 4:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details