महाराष्ट्र

maharashtra

US election 2020: जो बायडेन यांची राजकीय कारकीर्द आणि संघर्षाची कहाणी

By

Published : Nov 7, 2020, 11:13 PM IST

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत बाजी मारली आहे. ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

जो बायडेन
जो बायडेन

वॉशिंग्टन डी. सी - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत बाजी मारली आहे. ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अटीतटीच्या लढतीत बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. विजयासाठी हवा असलेला २७० मॅजिक नंबर बायडेन यांनी पार केला आहे. जाणून घेऊया बायडेन यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांच्या जीवनातील काही घडामोडी..

डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांची राजकीय कारकीर्द बरीच प्रदीर्घ आहे. 78 व्या वर्षी त्यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. डेलावेअर सिनेटचे माजी सदस्य जो बायडेन हे 2008 मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे 47 वे उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले होते आणि 2012 मध्ये ते पुन्हा निवडून आले होते.

कोण आहेत बायडेन?

जो बायडेन म्हणजेच जोसेफ रॉबिनेट बायडेन ज्युनियर यांचा जन्म 1942 मध्ये पेनसिल्व्हानियामधील स्क्रॅन्टन येथे झाला. त्यांचे बालपण डेलावेअर राज्यात गेले. जो बायडेन यांनी राजकारणात येण्यापूर्वी काही दिवस वकील म्हणून काम केले आहे. ते इतिहासातील पाचवे सर्वात तरुण अमेरिकन सिनेटचे सदस्य ठरले. तसेच, सर्वात जास्त काळ डेलावेअरमधील सिनेटचे सदस्य म्हणून काम करत आहे.

बायडेन यांनी यापूर्वीच अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत प्रवेश केला होता

डेलावेअर येथील सहा वेळा सिनेटचे सदस्य असलेले बायडेन तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरले आहेत. 1988 च्या निवडणुकीत त्यांनी प्रथम प्रयत्न केला. मात्र, तेव्हा त्यांना साहित्यिक चोरीच्या आरोपामुळे मागे हटावे लागले होते. त्यानंतर 2008 च्या निवडणुकीत त्यांनी दुसरा प्रयत्न केला.

बायडेन हे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. 2008 ते 2016 या काळात ओबामा यांच्या कार्यकाळात त्यांनी दोनदा उपराष्ट्राध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही पाठिंबा होता.

2017 मध्ये ओबामा यांनी जो बायडेन यांना त्यांच्या प्रशासनासाठी अध्यक्षपदासाठी सादर केले. दोन वर्षांनंतर, बायडेन यांनी आपल्या अध्यक्षीय प्रचारास प्रारंभ केला आणि 2020 मध्ये ते डेमॉक्रेटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार बनले होते.

कौटुंबिक अडचणींशी झुंज देत बायडेन या टप्प्यावर पोहोचले

1972 मध्ये बायडेन हे सिनेटसाठी निवडले गेलेल्या सर्वांत तरुण लोकांपैकी एक होते. काही आठवड्यांनंतर, बायडेन यांच्या कुटुंबात एक शोकपूर्ण घटना घडली। जेव्हा त्यांची पत्नी नीलिया आणि मुलगी नाओमी एका कार अपघातात ठार झाल्या आणि त्यांचे मुलगे हंटर आणि बीओ गंभीर जखमी झाले.

बायडेन आपल्या मुलांना पाहण्यासाठी विल्मिंगटन आणि वॉशिंग्टन डी.सी. दरम्यान दररोज अ‌ॅमट्रॅक ट्रेनने प्रवास करीत. त्यानंतर ते 'अ‌ॅमट्रॅक जो' या नावाने प्रसिद्ध झाले. पाच वर्षे बायडेन यांनी बहीण वेलेरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मदतीने बीओ आणि हंटर यांना वडील म्हणून एकट्याने (एकेरी पालक) वाढवले.

2015 मध्ये, बायडेन यांचा मोठा मुलगा बीओ यांचे वयाच्या 46 व्या वर्षी ब्रेन कॅन्सरमुळे निधन झाले. बायडेनचा लहान मुलगा हंटरबद्दल बोलायचे तर, वकील आणि लॉबीस्ट म्हणून त्यांची कारकीर्द भ्रष्टाचाराच्या आरोपांचे लक्ष्य ठरली आहे. पत्नी नीलियाच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर बायडेन यांनी जिलशी लग्न केले. त्यांना अ‌ॅशले नावाची एक मुलगी आहे. तिचा 1981 मध्ये जन्म झाला.

बायडेन यांचे प्राधान्यक्रम काय आहेत?

बायडेनला तीन प्रमुख प्राधान्यक्रम आहेत. यात आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करणे, शिक्षणात अधिक गुंतवणूक करणे आणि भागीदार देशांशी संबंध परत चांगल्या प्रकारे प्रस्थापित करणे यांचा समावेश आहे..

बायडेन यांचे भारताबद्दल काय मत आहे?

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय-अमेरिकन समुदायाला संबोधित करताना बायडेन म्हणाले की, जर त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली तर, भारताला भेडसावणाऱ्या धोक्यांशी सामना करण्यासाठी ते भारताच्या बाजूने उभे राहतील.

बायडेन म्हणाले की, '15 वर्षांपूर्वी मी भारताबरोबर ऐतिहासिक नागरी अणुकरार मंजूर करण्याच्या प्रयत्नाचे नेतृत्व करीत होतो. मी म्हटले होते की, भारत आणि अमेरिका जवळचे मित्र आणि सहयोगी बनले तर जग अधिक सुरक्षित होईल.' ते असेही म्हणाले की, ते दोन्ही देशांमधील व्यापार वाढविण्यावर आणि हवामान बदलांसारख्या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी काम करतील.

विवादांशी संबंधित आहेत

बायडेन यांच्यावर ब्रिटिश लेबर पार्टीच्या नील किन्नॉक यांच्या भाषणाची साहित्यिक चोरी करण्याचा आरोप होता. याव्यतिरिक्त, बायडेन यांनी कबूल केले की, लॉ स्कूलमध्ये पहिल्या वर्षाच्या काळात त्यांनी कायद्याचा आढावा घेणारा एक लेखही चोरला होता.

लैंगिक छळाचा आरोपही करण्यात आला

बायडेन यांच्या सिनेट कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेने वॉशिंग्टन डीसी पोलिसांत फौजदारी तक्रार दाखल केली. 1993 मध्ये बायडेन यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला होता.

2007 मध्ये गोळी लागल्याचा केला होता दावा, नंतर वक्तव्यावरून घेतली 'पलटी'

2007 मध्ये, बायडेन यांनी दावा केला होता की, त्यांना इराकच्या ग्रीन झोनमध्ये गोळी लागली होती. परंतु, नंतर जिथे गोळी चालविली गेली, त्या जागेच्या जवळच ते होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details