महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोना : ब्राझीलमध्ये एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दुप्पट

एकाच दिवसात मरण पावलेल्या लोकांची संख्या आता दुप्पट झाली असल्याचे वृत्तसंस्था शिन्हुआने माहिती दिली आहे. 29,787 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना महामारी देशात सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एकूण 5,439,641 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

ब्राझील
ब्राझील

By

Published : Oct 28, 2020, 3:57 PM IST

साओ पोलो - ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूमुळे एका दिवसात 549 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता 157,946 वर पोहोचली आहे. ब्राझीलच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

एकाच दिवसात मरण पावलेल्या लोकांची संख्या आता दुप्पट झाली असल्याचे वृत्तसंस्था शिन्हुआने माहिती दिली आहे. 29,787 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना महामारी देशात सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एकूण 5,439,641 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

हेही वाचा -फ्रान्सविरोधात पाकिस्तानात आंदोलन, मॅकराॅन यांच्या मुस्लिम धर्मावरील वक्तव्याचा निषेध

साओ पोलो ब्राझीलमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य असून येथेच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे 38,885 लोकांचा येथे मृत्यू झाला असून 1,098,207 एकूण कोरोनाबाधित लोक सापडले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details