महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

हिंदू समुदाय धोकादायक अन् अत्याचारी असेल तर, विस्थापित हिंदू शांतताप्रिय कसे? - अमेरिकन विचारवंत - national security threats

तत्वज्ञ फ्रॉली यांनी आणखी एक ट्विट करत 'हिंदू धर्मात वैश्विकतेची शिकवण दिली गेली असली तरी, सध्या काही विचारवंत 'हिंदुत्व' जातीयतावादी असल्याचे म्हणत आहेत. तर, परिवर्तनवादी सिद्धांतांना धर्मनिरपेक्ष म्हणून गणले जात आहे. हा स्पष्टपणे धर्म नाकारल्याचा प्रकार आहे. तसेच, तो राजकीय हेतूने प्रेरित आहे,' असे म्हटले आहे.

अमेरिकन विचारवंत डॉ. डेव्हिड फ्रॉली

By

Published : Jul 29, 2019, 10:26 PM IST

वॉशिंग्टन - 'जर हिंदू समुदाय धोकादायक आणि अत्याचारी असेल तर, विस्थापित हिंदू शांतताप्रिय कसे?,' असा सवाल अमेरिकन विचारवंत आणि हिंदू संस्कृतीचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉली यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 'सध्या काही लोक हिंदूंवर विविध धोकादायक कृत्यांचे आणि अत्याचारांचे आरोप करत आहेत. मात्र, असे असेल तर, भारताबाहेर विस्थापित झालेल्या हिंदूंनी तेथे कायदा सुव्यवस्थेला आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवलेला नाही हे कसे?' असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

'जगभरात भारताबाहेर इतर देशांमध्ये स्थायिक किंवा विस्थापित झालेले हिंदू शांतताप्रिय, उद्योगी (उत्पादक) असून त्यांनी इतरांकडून मानसन्मान मिळवला आहे. त्यांनी त्या-त्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेला आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवलेला नाही. त्यांनी तसे केल्याचे कुठेच ऐकिवात येत नाही,' असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.


तत्वज्ञ फ्रॉली यांनी आणखी एक ट्विट करत 'हिंदू धर्मात वैश्विकतेची शिकवण दिली गेली असली तरी, सध्या काही विचारवंत 'हिंदुत्व' जातीयतावादी असल्याचे म्हणत आहेत. तर, परिवर्तनवादी सिद्धांतांना धर्मनिरपेक्ष म्हणून गणले जात आहे. हा स्पष्टपणे धर्म नाकारल्याचा प्रकार आहे. तसेच, तो राजकीय हेतूने प्रेरित आहे,' असे म्हटले आहे.

डेव्हिड यांच्या पहिल्या ट्विटला आतापर्यंत ४ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. तर, दहा हजारहून अधिक जणांनी लाईक केले आहे. हिंदू संस्कृती, फल ज्योतिष आणि आयुर्वेद या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या डेव्हिड यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. सध्या त्यांनी वामदेव शास्त्री हे नाव स्वीकारले आहे. तसेच, त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. ते अमेरिकेतील साण्टा शहरामध्ये अमेरिकन वैदिक इन्स्टीट्यूट या संस्थेच्या माध्यमातून वैदिक पुराण आणि आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details