कॅलिफोर्निया - गुगलची मुळ कंपनी अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सुंदर पिचाई या मूळ भारतीय असलेल्या तरुणाची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी या पदाचा कारभार सर्जी ब्रिन हे सांभाळत होते.
गूगलच्या पुनर्बांधणीसाठी ऑगस्ट २०१५ मध्ये अल्फाबेटची स्थापना करण्यात आली. अल्फाबेट नावाची अमेरिकन कंपनी गूगल, कॅलिको, गूगल-एक्स, नेस्ट-लॅब यांची मुख्यकंपनी असून, इतर अनेक सेवा पुरवते.
सुंदर पीचाई यांच्याविषयी...
तामिळनाडूत जन्मलेले पिचई खरगपूर आयआयटीचे विद्यार्थी आहेत. आयआयटी खरगपूरमधून त्यांचे अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. २००४ पासून ते गुगलमध्ये कार्यरत असून २००८ मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली गुगल क्रोम ही नवी प्रणाली स्थापन करण्यात आली. क्रोमच्या यशानंतर जीमेल अॅपचेही काम पिचई यांच्याकडे आले. त्यानंतर ते अँड्रॉइडचे प्रमुख झाले. अँड्रॉइड ही गुगलची मोबाइल फोन संचालन प्रणाली आहे. त्यानंतर 2015 लोकप्रीय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गुगलच्या प्रमुखपदी सुंदर पिचई यांची नियुक्ती करण्यात आली होती.