वॉशिग्टंन डी. सी - जगभरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून गेल्या 24 तासांत जागतिक स्तरावर तब्बल 2 लाख 27 हजार 727 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 3 हजार 812 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझिलमध्ये सर्वांत जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
जगभरात 2 कोटी 72 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग ; तर 8 लाख 87 हजार बळी
जगभरात 2 कोटी 72 लाख 90 हजार 531 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आत्तापर्यंत कोरोनामुळे संपूर्ण जगात 8 लाख 87 हजार 554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 कोटी 93 लाख 74 हजार 135 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जगातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने दोन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात 2 कोटी 72 लाख 90 हजार 531 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आत्तापर्यंत कोरोनामुळे संपूर्ण जगात 8 लाख 87 हजार 554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 कोटी 93 लाख 74 हजार 135 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
अमेरिकेत 64 लाख 60 हजार 250 रुग्णांची नोंद झाली. तर भारत सध्या दुसऱ्या स्थांनावर असून गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 90 हजार 802 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 42 लाखांवर गेली आहे. तर तिसऱ्या स्थानावर ब्राझील असून तिथे 41 लाख 37 हजार 606 रुग्ण आढळले आहेत. तसेच ब्राझील पाठोपाठ रशिया आणि पेरूत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळली आहे.