महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जगभरात 1 कोटी 23 लाख 78 हजार 854 नागरिकांना कोरोनाची लागण - जगभरात कोरोनाबाधित रुग्ण

अद्यायावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 23 लाख 78 हजार 854 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 लाख 56 हजार 601 कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 71 लाख 82 हजार 395 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोना
कोरोना

By

Published : Jul 10, 2020, 12:09 PM IST

वॉशिंग्टन डी. सी -कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात तब्बल 2 लाख 23 हजार 449 कोरोना रुग्ण आढळले असून 5 हजार 417 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी

अद्यायावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 23 लाख 78 हजार 854 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 लाख 56 हजार 601 कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 71 लाख 82 हजार 395 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

अमेरिकेत 32 लाख 19 हजार 999 जणांना कोरोनाची बाधा असून 1 लाख 35 हजार 822 जणांचा बळी गेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल आहे. ब्राझिलमध्ये 17 लाख 59 हजार 103 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 69 हजार 254 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यापाठोपाठ भारत, रशिया, पेरूमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत.

जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना, यूस, भारत, डेन्मार्क, इटली या देशांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने नागरिकांचा रस्त्यावरील वावर वाढला तर कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details