महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Global COVID-19 tracker: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ३७ लाखांवर.. मृतांची संख्या अडीच लाख - कोरोना वर्ल्ड अपडेट

एकट्या अमेरिकेमध्ये ७२ हजार २७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण इटली, ब्रिटन, स्पेन या देशांमध्ये दगावले आहेत.

Global COVID-19 tracker
कोरोना जागतिक आकडेवारी

By

Published : May 6, 2020, 11:54 AM IST

हैदराबाद - जगभरामध्ये ३७ लाख २७ हजार ८०२ पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर २ लाख ५८ हजार ३३८ पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे विविध देशांत १२ लाख ४२ हजार ३४७ रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.

अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.

सर्वात जास्त कोरोनाच प्रसार झालेल्या देशांमधील परिस्थिती

कोरोना जागतिक आकडेवारी

ABOUT THE AUTHOR

...view details