वॉशिंग्टन डी. सी - जगभरामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत जगभरात कोरोनाचा संसर्ग झाल्याने २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील जॉन हॉप्किन्सन विद्यापीठाने अद्यायावत आकडेवारी जाहीर केली आहे.
Global COVID-19: जगभरात कोरोनामुळे तब्बल २ लाख ५० हजार जणांचा मृत्यू
जागतिक स्तरावर एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३५ लाख ८२ हजार ४७९ झाली आहे. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त म्हणजे ११ लाख ८० हजार २८८ रुग्णांची नोंद झाली आहे.
आज(मंगळवार) सकाळपर्यंत २ लाख ५१ हजार ५१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. ६८ हजार ९२२ रुग्णांचा देशात मृत्यू झाला आहे. तर २० हजारांपेक्षा जास्त मृत्यू झालेल्या देशांमध्ये इटली(२९ हजार७९), इंग्लड(२८ हजार ८०९), स्पेन(२५ हजार ४२८), फ्रान्स(२५ हजार २०४) यांचा समावेश आहे.
जागतिक स्तरावर एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३५ लाख ८२ हजार ४७९ झाली आहे. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त म्हणजे ११ लाख ८० हजार २८८ रुग्णांची नोंद झाली आहे.