अमेरिकेत ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप, जीवितहानी नाही
दरम्यान, वायूची गळती झाल्यामुळे आगीचे वृत्त आहे. या भागात वीज खंडित झाली असून, पाणीपुरवठा आणि दूरसंचारवरही परिणाम झाला आहे.
वॉशिंग्टन - दक्षिण कॅलिफोर्नियाला शुक्रवारी गेल्या दोन दशकातील सर्वांत मोठा भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर तो ७.१ मोजण्यात आला. भूकंपाचे केंद्र लॉस एंजेलिसपासून सुमारे २४० किलोमीटर अंतरावर होते.
भूकंपाचे वृत्त समजताच शनिवारी सकाळी लवकर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि सुरक्षा दले घटनास्थळी रवाना झाले. भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही. किंवा कोणी जखमीही झालेले नाही. दरम्यान, वायूची गळती झाल्यामुळे आगीचे वृत्त आहे. या भागात वीज खंडित झाली असून, पाणीपुरवठा आणि दूरसंचारवरही परिणाम झाला आहे.