महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ढोलकी वाजविणाऱ्या लोकांच्या मेंदूची रचना आणि कार्यक्षमता असते उत्तम - Bergmanshall University Clinic

ढोलकी वाजविणाऱ्या लोकांच्या मेंदूची रचना आणि कार्यक्षमता ही इतर लोकांच्या तुलनेत उत्तम असल्याचे एका आभ्यासातून समोर आले आहे. या शोधाविषयी 'ब्रेन अँड बिहेवियर' या मासिकेत माहिती देण्याता आली आहे.

washington
प्रतिकात्मक

By

Published : Dec 15, 2019, 3:12 PM IST

वाशिंग्टन (यू.एस.ए)- ढोलकी वाजविणाऱ्या लोकांच्या मेंदूची रचना आणि कार्यक्षमता ही इतर लोकांच्या तुलनेत उत्तम असल्याचे एका आभ्यासातून समोर आले आहे. या शोधाविषयी 'ब्रेन अँड बिहेवियर' या मासिकेत माहिती देण्यात आली आहे. बोचूम येथील 'बर्गमनशेल युनिव्हर्सिटी क्लिनिक' येथील डॉ. लारा श्लाफ्के आणि 'रूहर युनिव्हर्सिटी ऑफ बोचूमच्या बायोफिजिकल रिसर्च युनिट' मधील सहयोगी प्राध्यापक डॉ. सिबास्चियन ओकलेनबर्ग यांनी हा शोध केला आहे.

डॉ. लारा श्लाफ्के आणि डॉ. ओकलेनबर्ग यांच्या शोधानुसार ढोलकी वाजविणाऱ्या व्यक्तींच्या मेदूत कमी पण जाड तंतू असतात. हे तंतू मेंदूच्या दोन भागांमधील कनेक्टिंग ट्रक्ट्समध्ये असतात व ते मेदूतील दोन्ही भागात उत्तमरित्या माहितीचे संचार घडवून आणतात. याबाब माहिती देताना डॉ. लारा श्लाफ्के यांनी सांगितले की, बहुतांश लोक एका हाताने वाद्य वाजवू शकतात. मात्र, दोन्ही हाताने वेगवेगळ्या तालात वाद्य वाजविण्यात त्यांना समस्या होतात. ढोलकी वाजविणारे हे काम करू शकतात.

शोधकर्त्यांनी २० व्यावसायिक ढोलकी वादक जी दिवसातून १० तास सराव करतात अशांचे एमआरआई तंत्रज्ञानाद्वारे निरीक्षण केले. आणि हे निरीक्षण वाद्य व संगिताशी संबंध नसलेल्यांशी जुळवून बघितले. यातून ढोलकी वाजविणाऱ्या लोकांच्या मेदूमध्ये जाड तंतू असून ते मेदूतील दोन्ही भागात माहितीचे संचार उत्तमरित्या करित असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा-आसाम : CAA विरोधातील निदर्शनांमध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू, २७ जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details