महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'कट्टरतावादी मुस्लीम दहशतवाद संपवण्यासाठी काम करतच राहणार'

ट्रम्प अमेरिकेला युद्धाच्या खाईत ढकलत असल्याचा सुरू देशातून उमटत आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीम कट्टरतावादी दहशतवाद्यांना पुन्हा डिचवले आहे.

donald trump
डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Jan 10, 2020, 10:45 AM IST

वॉशिंग्टन डी. सी- इराकमध्ये केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतूनच टीका होत आहे. ट्रम्प अमेरिकेला युद्धाच्या खाईत ढकलत असल्याचा सुरू देशातून उमटत आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीम कट्टरतावादी दहशतवाद्यांना पुन्हा डिचवले आहे.

माझ्या काळात अमेरिकेच्या शत्रूंना कधीही माफ करणार नाही. अमेरिकेन नागरिकांचे संरक्षण करण्यास कधीही कचरणार नाही. तसेत कट्टर मुस्लीम दहशतवाद्यांविरुद्ध काम करणे कधीही थांबवणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मागील आठवड्यात अमेरिकेने इराणचे लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांना इराकमध्ये रॉकेट हल्ल्यात ठार मारले. त्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका जवळ आल्यानेच ट्रम्प यांनी हा हल्ला केल्याचाही आरोप होत आहे. रॉकेट हल्ल्यामुळे परदेशात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे संसद सदस्यांनीही म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details