महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

COVID-19 : अमेरिकेत कोरोनाचे 3 हजार बळी, एक लाख 63 हजार रुग्ण - जागतिक आरोग्य आणीबाणी

अमेरिकेत सर्वाधिक 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण न्यूयॉर्क शहरात आढळले आहेत. सर्वाधिक 1 हजार 200 मृत्यूही तेथेच झाले आहेत.

अमेरिकेत कोरोनाचे 3 हजार बळी
अमेरिकेत कोरोनाचे 3 हजार बळी

By

Published : Mar 31, 2020, 2:42 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 3 हजारावर पोहोचला आहे. जोन्स हॉपकिन्स सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

सोमवारी अमेरिकेत एक लाख 63 हजार कोरोनाची लागण झालेले रुग्ण होते. तर, मृतांचा आकडा 3 हजार 08 वर पोहोचला होता, असे सीएसएसइने म्हटले आहे. यातील सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्क शहरात सापडले आहेत आणि सर्वाधिक मृत्यूही तेथेच झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये आत्तापर्यंत एकूण 67 हजार कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर, 1 हजार 200 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात आतापर्यंत 7 लाख 84 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 37 हजार 638 मृत्यू झाले आहेत. तसेच, 1 लाख 65 हजार लोक या आजारातून बरे देखील झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details