न्यूयॉर्क - जनरल चार्ल्स क्यू. ब्राऊन ज्यूनिअर यांची अमेरिकेच्या सैन्य सेवेतील प्रमुख अधिकारी म्हणून एकमताने निवड करण्यात आली. यावर अमेरिकेच्या सिनेटने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. ते अमेरिकेच्या सैन्य सेवेतील प्रमुख म्हणून काम पाहणारे पहिले कृष्णवर्णीय अधिकारी आहेत.
मिनियापोलीसमधील पोलीस कोठडीत जॉर्ज प्लॉइडच्या हत्येनंतर ट्रम्प प्रशासन आणि गौरवर्णीय सिनेट सदस्यांकडून ब्राऊन यांची नियुक्ती करण्यात आली.
ब्राऊन यांची नुकतेच यूएस पॅसिफिक हवाई दलाचे कमांडर म्हणून काम पाहिले आहे. ते फायटर पायलट आहेत. त्यांनी 130 लढायांमध्ये सहभागी होत 2900 तास त्यांनी हवाई उड्डाण केले आहे. ब्राऊन यांनी आरओटीसी या प्रोग्राममध्ये टेक्सास टेक युनिव्हर्सिटीतून पदवीचे शिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी हवाईदलात वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. यासोबतच त्यांनी यूएस हवाई दलाच्या शस्त्रास्त्रे शाळेत एफ - 16 या लढाऊ विमानाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
शुक्रवारी त्यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात वाशिंक पक्षपातीचे जीवन जगण्याचे वर्णन केले आणि गौरवर्णीय समाजात वावरण्यासाठीचा संघर्ष याचे वर्णन केले आहे.