महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Omicron Symptoms : जाणून घ्या... AIIMS ने जाहीर केलेली ओमायक्रॉनची धोकादायक लक्षणे - ओमायक्रॉन व्हायरस ची लक्षणे

ओमायक्रॉनच्या लक्षणांबाबत वेळोवेळी आरोग्य तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अ‍ॅनालिसिसने या प्रकाराची चार सर्वात सामान्य लक्षणं ( Omicron Symptoms released by AIIMS ) सांगितली आहेत. ज्यामध्ये खोकला, थकवा, कफ आणि नाक वाहणे यांचा समावेश आहे.

Omicron Symptoms
ओमायक्रॉनची धोकादायक लक्षणे

By

Published : Jan 8, 2022, 12:35 PM IST

मुंबई : संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनने आता भारतावर नजर टाकली आहे. देशात कोरोनाचे दररोज अनेक रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1 लाख 41 हजार 986 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या आता 3,071 वर पोहोचली आहे. जी चिंतेची बाब आहे.

चार सर्वात सामान्य लक्षणं -

ओमायक्रॉनच्या लक्षणांबाबत वेळोवेळी आरोग्य तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अ‍ॅनालिसिसने या प्रकाराची चार सर्वात सामान्य लक्षणं ( Omicron Symptoms released by AIIMS ) सांगितली आहेत. ज्यामध्ये खोकला, थकवा, कफ आणि नाक वाहणे यांचा समावेश आहे.

...म्हणजे तुमचा संसर्ग गंभीर -

तर, एम्सने ओमायक्रॉनची पाच लक्षणे सांगताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका असा इशारा दिला आहे. ही लक्षणे दिसणे म्हणजे तुमचा संसर्ग गंभीर आहे, असंही सांगितले आहे.

ओमायक्रॉनची 5 धोकादायक लक्षणे ( 5 Symptoms Of Omicron ) -

1. श्वास घेण्यास त्रास होणे

2. ऑक्सिजन सॅच्युरेशनमध्ये घट होणे

3. छातीत सतत वेदना/दाब जाणवणे

4. मानसिक गोंधळ उडणे किंवा प्रतिसाद देऊ न शकणे

5. लक्षणे 3-4 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास किंवा प्रकृती आणखी बिघडल्यास

त्वचेचा, ओठांचा किंवा नखांचा रंग अचानक बदलला तरी सतर्क राहण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा -Maharashtra Corona Update: राज्यात धडकी भरवणारी रुग्णसंख्या; कोरोनाचे आढळले 40 हजार 925 रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details