वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेमध्ये सध्या अध्यपदाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांच्यात होणारी अध्यक्षपदाची दुसरी वादविवाद फेरी रद्द झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने दुसरी वादविवाद फेरी 'व्हर्च्युअल' पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता.
अमेरिका निवडणूक : अध्यक्षपदाची दुसरी वादविवाद फेरी रद्द
रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांच्यात होणारी अध्यक्षपदाची दुसरी वादविवाद फेरी रद्द झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे वादविवाद फेऱ्या आयोजीत करताना सुरक्षतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. तथापि, ट्रम्प यांची प्रकृती स्थिर असून ते सार्वजनिक रॅलीमध्ये सहभाग घेऊ शकतात, असे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचार केलेल्या वैद्यकीय टीमने स्पष्ट केले. कोरोनाच्या धोक्यामुळे वादविवाद फेरी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे.
दुसरी वादविवादाची फेरी 15 ऑक्टोंबरला फ्लोरिडा राज्यात होणार होती. ट्रम्प यांनी अध्यक्षीय चर्चेत सहभागी होऊ नये, असे वादविवाद फेरी रद्द होण्यापूर्वी जो बायडेन म्हणाले होते. दरम्यान, पहिली अध्यक्षीय चर्चा ( प्रेसिडेंशियल डिबेट) 7 ऑक्टोबरला पार पडली आहे. तर आता येत्या 22 ऑक्टोबरला तीसरी अध्यक्षीय चर्चा होणार आहे.