महाराष्ट्र

maharashtra

कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीशी संबंधित 14 जण वाई पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Apr 30, 2021, 12:42 PM IST

जिल्ह्यात बेकायदा प्रवेश केलेल्या 14 जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्याच्या तपासणी नाक्यावर दुपारी ताब्यात घेतले. हे सर्व जण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशांच्या वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले

गज्या मारणे टोळीशी संबंधित 14 जण वाई पोलिसांच्या ताब्यात
गज्या मारणे टोळीशी संबंधित 14 जण वाई पोलिसांच्या ताब्यात

सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली संचारबंदी व जिल्हा बंदीचे आदेश लागू आहेत. मात्र हे आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 14 जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्यातून ताब्यात घेतले. हे सर्व जण पैशांच्या वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील काही लोकांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे.

बंदी आदेशाचा भंग

शासनाचा बंदी आदेश मोडून सातारा जिल्ह्यात बेकायदा प्रवेश केलेल्या 14 जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्याच्या तपासणी नाक्यावर दुपारी ताब्यात घेतले. हे सर्व जण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशांच्या वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात संबंधितांची पुर्वपीटीका तपासण्याचे काम सुरू होते. उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

वसुलीसाठी होते आले

पाचगणी येथील एका शाळेचा चालक व वाई येथील बिल्डरशी संबंधित पैशाच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे 14 जण तीन मोटारीतून वाईला आले होते. पाचगणी येथे जाऊन येऊन वाईत एकाच्या घरी घेले होते. तेथून पुणे - महाबळेश्वर रस्त्याने वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाई पोलीस ठाण्यात आणले. त्यांची अधिक चौकशी सुरू आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. त्यांच्याकडून दप्तर अहवाल मागविण्यात आला आहे.

बंदी आदेश उल्लंघनचा गुन्हा शक्य

या चौदा जणातील काही जण गुंड गजा मारणे टोळीशी संबंधित असल्याची पोलिसांची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांनी संबंधित बिल्डर व पाचगणीतील शाळा चालकालाही चौकशीसाठी बोलावले होते. या दोघांनी संबंधित 14 जणांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे तोंडी सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

पुण्यातील पोलीस अहवालाच्या प्रतीक्षेत उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती. मात्र त्यांच्यावर जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलीस व्यक्त केली. वाई पोलीस ठाण्यात सातारा स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे निरीक्षक रमेश गर्जे व पथक दाखल झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details