महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

सुलेमानींच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; तब्बल 56 जणांचा मृत्यू, कित्येक गंभीर जखमी - kasim solemani funeral stampede

अमेरिकी ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले इराणच्या रिवोल्युशनरी गार्डचे जनरल कासीम सुलेमानी यांच्या अंत्यविधी समारोहात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. ही घटना कासीम यांचे जन्मगाव असलेल्या करमन या ठिकाणी घडली आहे. या घटनेत ५६ लोकांचा मृत्यू झाला असून ४८ जण गंभीर जखमी झाल्याचे समजले आहे.

iran
जनरल कासीम सोलैमानींच्या अंत्यविधी समरोह

By

Published : Jan 7, 2020, 7:49 PM IST

Updated : Jan 8, 2020, 7:26 AM IST

इराण- अमेरिकी ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले इराणच्या रिवोल्युशनरी गार्डचे जनरल कासीम सुलेमानी यांच्या अंत्यविधी समारोहात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. ही घटना कासीम यांच्या जन्मगाव असलेल्या करमन या ठिकाणी घडली आहे. या घटनेत ५६ लोकांचा मृत्यू झाला असून कित्येक जण गंभीर जखमी असल्याचे समजले आहे. सदर माहिती द आयरिश टाईम्स या वृत्त माध्यमातून मिळाली आहे.

जनरल कासीम सोलैमानींच्या अंत्यविधी समरोहात चेंगराचेंगरी

मिळालेल्या माहितीनुसार, कासीम सुलेमानी यांचा अंत्यविधी सोहळा सुरू असताना चेंगराचेंगरीची घटना घडली. घटनेनंतर लोकं रस्त्यावर पडून होते आणि काही लोक मदतीसाठी ओरडत होते. दरम्यान, इराणच्या आपात्कालीन वैद्यकीय सेवेचे अध्यक्ष पीरहोसेन कौलिवांड यांनी इराणीयन स्टेट टीव्हीशी संपर्क साधून याप्रकरणाची शहानिशा केली. त्यात सदर अपघाताचे वृत्त खरे असल्याचे पीरहोसेन कौलिवांड यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, सदर चेंगराचेंगरीच्या घटनेत आमचे काही नागरिक जखमी आणि मृत्युमुखी पडल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

आज लाखोच्या संख्येमध्ये इराणी नागरिकांनी रिवोल्युशनरी गार्डचे जनरल कासीम सोलेमानी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कर्मन शहरातील रस्ते शोककर्त्यांनी भरून गेले होते. यावेळी रिवोल्युशनरी गार्डचे सेनापती कासीम सुलेमानी यांनी नागरिकांना संबोधित केले. दरम्यान, जनरल कासीम सुलेमानी यांची इराकच्या बगदाद विमानतळाजवळ शुक्रवारी हत्या करण्यात आली होती. अमेरिकेने ड्रोनद्वारे हा हल्ला केला होता. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून हा हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर चवताळलेल्या इराणने अमेरिकेला धमकी दिली होती. त्या विरोधात अमेरिकेनेही इराणच्या ५२ संवेदनशील ठिकाण्यांना लक्ष करण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा-इराण-अमेरिका संघर्ष आणि भारताची भूमीका..

Last Updated : Jan 8, 2020, 7:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details