महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उपराष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी; डेमोक्रॅटिक पक्षाकडून घोषणा - अमेरिका उपाध्यक्षपद निवडणूक

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांची निवड केली आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

कमला हॅरिस
कमला हॅरिस

By

Published : Aug 12, 2020, 10:41 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेमध्ये येत्या काही दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांची निवड केली आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदासाठी उमेदवार घोषित करताना मला अभिमान वाटत आहे. त्या एक शूर योद्धा आहे. अमेरिकेतील सर्वोत्तम लोकसेवकांपैकी एक असलेल्या कमला हॅरिस माझ्या सहकारी असतील, असे बिडेन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तसेच कमला हॅरिस यांनी आपली उपाध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल बिडेन यांचे आभार मानले आहेत. 'जो बिडेन हे अमेरिकेतील लोकांना एकत्र करू शकतात. कारण, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य येथील लोकांसाठी लढले आहे. आपल्या आदर्शांवर खरी उतरणारी अमेरिका ते निर्माण करतील. उपराष्ट्रपतीपदासाठी पक्षाच्या उमेदवाराच्या रूपात माझी निवड केल्याचा मला अभिमान आहे. त्यांना कमांडर-इन-चीफ बनवण्यासाठी जे काही करावं लागले, ते मी करले', असे कमला यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

कमला हॅरिस या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला असून त्यांच्या आईचा जन्म भारतात झाला होता, तर वडील जमैकन आहेत. तसेच उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. यापूर्वी अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी दोन महिलांना उमेदवारी दिली होती. मात्र, डेमोक्रेटिक पक्षाच्या गेराल्डाइन फरेरो (1984) आणि रिपब्लिकन पक्षाच्या सारा पॅलिन (2008) यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. जर कमला हॅरिस निवडणूक जिंकल्या तर उपराष्ट्राध्यक्ष बनणाऱ्या त्या पहिल्या महिला असणार आहेत. विद्यमान उपाध्यक्ष माइक पेन्स पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाकडून उपाध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत.

कमला हॅरिस दोन वेळा अॅटर्नी जनरल होत्या. त्यानंतर 2017 साली त्या खासदार म्हणून निवडून गेल्या. तसेच त्या यापूर्वी जो बिडेन यांच्यासोबत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडल्या होत्या. आता त्यांची पुन्हा डेमोक्रेटिक पक्षाकडून उपाध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवड केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details