महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Watch Video सिध्दार्थसोबतच्या लग्नावरुन कियारा अडवाणीला शाहिद कपूरने चिडवले - कॉफी विथ करणमध्ये शाहिद कपूर

अभिनेता कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर ही जोडी करण जोहरच्या लोकप्रिय आणि वादग्रस्त चॅट शो, कॉफी विथ करणचे पुढील पाहुणे असणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रासोबत असलेल्या रिलेशनशीपची कबुली या भागात कियारा अडवाणीने दिली आहे. या एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला असून यात कियारा म्हणते की, सिध्दार्थ हा क्लोज रिलेशनशीपहून अधिक जवळचा आहे.

कियारा अडवाणीला शाहिद कपूरने चिडवले
कियारा अडवाणीला शाहिद कपूरने चिडवले

By

Published : Aug 22, 2022, 12:26 PM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी कॉफ़ी विथ करण 7 या शोच्या सोफ्यावर विराजमान झाले आहेत. या शोचा नवीन प्रोमो आला असून त्यात ही जोडी दिसत आहे.

प्रमोशनल व्हिडिओमध्ये, कबीर सिंग या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केलेली शाहिद आणि कियारा करण ही जोडी करण जोहर होस्ट करत असलेल्या शोमध्ये मजा करताना दिसेल. आगामी एपिसोडमध्ये शाहिद आणि करण जोहर कियाराला सिद्धार्थसोबतच्या नातेसंबंधाची कबुली देण्यासाठी उद्यूक्त करताना दिसतात. पण ती तिच्या विनोदी उत्तरांनी दोघांनाही मागे टाकते आणि म्हणते की ती सिद्धार्थला डेट करते हे नाकारत नाही.

व्हिडिओच्या शेवटी, शाहिद कियारा अडवाणीसोबत सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाचे संकेत देताना दिसत आहे. शाहिद आणि करण म्हणतात की सिद्धार्थ आणि कियारा एकत्र सुंदर दिसत आहेत आणि त्यांचे लग्न झाल्यास त्यांची भावी मुले सुंदर होतील. शाहिद आगीत आणखी तेल टाकतो आणि म्हणतो, "या वर्षाच्या अखेरीस मोठ्या घोषणेसाठी तयार राहा आणि हा चित्रपट नाही."

गेल्या आठवड्यात जेव्हा सिद्धार्थ विकी कौशलसोबत शोमध्ये दिसला तेव्हा त्याने कियारासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले नाही परंतु तो म्हणाला की त्याला कियारासोबत भविष्य उज्वल असल्याचे वाटते. सिद्धार्थ आणि कियाराचा प्रणय आता तीन वर्षांहून अधिक काळा सुरू आहे. परंतु या दोघांनी अद्याप अधिकृतपणे त्यांच्या रोमान्सची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा -प्रियंका चोप्राने शेअर केला लेक मालतीसोबतचा सेल्फी

ABOUT THE AUTHOR

...view details