मुंबई- Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण' सीझन 8 च्या आगामी एपिसोडमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर शोच्या सोफ्यावर बसलेले दिसणार आहेत. या दोघांना बोलतं करताना झालेल्या चर्चेकडे तमाम चाहते लक्ष ठेवून आहेत.
सारा अली खान सोबत जेव्हा अनन्या पांडे आली होती तेव्हा तिचा उल्लेख सारानं "अनन्या कोय कपूर" असा खेळकरपणे केला होता. अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्यासंबंधातलं हे विधान होतं. या शोमध्ये आदित्यनं मात्र खूप सावधगिरी बाळगत आणि करणच्या खासगी चौकशीला बगल देण्याचा प्रयत्न केला. करणनं जेव्हा त्याला अनन्याशी डेटिंग करण्याबद्दलचा प्रश्न विचारला तेव्हा आदित्यने करणलाच एक डोस पाजला. या प्रश्नाला उत्तर देताना तो चतुराईनं म्हणाला, "मला कोणतंही गुपिते विचारू नका, आणि मी तुम्हाला काही खोटे सांगणार नाही."
आदित्यच्या सावधगिरीला न जुमानता, करणने एक काल्पनिक परिस्थिती मांडली आणि अर्जुनला विचारले की, "अनन्या आणि श्रद्धा कपूर सोबत जर लिफ्टमध्ये अडकला तर तो काय करेल?" यावर तो म्हणाला, "आशिकी तो जरूर करता अब किसके साथ वो नहीं पता," या अर्जुनच्या मिष्कील उत्तराने आदित्यची आश्चर्यचकित प्रतिक्रिया उमटली, त्यानंतर अर्जुनने हे सगळे मस्करीत बोललो असेही सांगितले.