महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Koffee With Karan 8: सलमान खानमुळे सीझनचा अखेर होणार संस्मरणीय, जोडीदाराचा शोध जारी - सलमान खान टायगर 3

करण जोहरचा कॉफी विथ करण चा 8 वा सीझन चांगलीच खळबळ माजवत आहे. या पर्वाचा शेवट सलमानच्या एन्ट्रीनं करण्याचा निर्णय निर्मात्यानी घेतलाय. त्याच्यासोबत जोडीदार म्हणून करण समोर सोफ्यावर कोण बसणार याचा शोध सुरू झालाय.

Koffee With Karan 8
सलमान खानमुळे सीझनचा अखेर होणार संस्मरणीय

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 5:12 PM IST

मुंबई- 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय चॅट शोच्या 8 व्या पर्वाची सुरुवात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या उपस्थितीनं एनर्जिटिक झालीय. त्यानंतर बॉलिवूड सेलेब्रिटींच्या रसाळ चर्चा, गौप्य स्फोट, रहस्यभेद आणि भरपूर मसाला पुरवणाऱ्या गोष्टींनी प्रत्येक एपिसोड बातम्यांच्या मथळ्यांचा विषय बनतोय. या शोच्या शेवटच्या भागासाठी होस्ट करण जोहरनं सलमान खानशी संपर्क साधलाय. शोचा अखेर संस्मरणीय करण्याच्या उद्देशानं सलमानची उपस्थिती शोच्या लोकप्रियतेला उंचीवर नेणारी ठकरु शकते. त्याच्यासोबत जोडीदार म्हणून कोण येतंय हे पाहणं रंजक असणार आहे.

कॉफी विथ करण सीझन 8 च्या सुरुवातीच्या एपिसोडपासून शोमध्ये येणाऱ्या सेलेब्रिटींनी नातेसंबंधाची आणि लग्नाची खुलेपणाने चर्चा केली होती. यात सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यातील भावंडं म्हणून असलेलं नातं हृदयस्पर्शी होतं. लेटेस्ट भागात सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्या रोमँटिक जीवनातील गोष्टी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या होत्या.

पण यातला उत्साह तिथेच संपणारा नाही. आगामी भागांमध्ये आलिया भट्ट आणि करीना कपूर खान, काजोल आणि राणी मुखर्जी, आणि अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांसारख्या प्रभावी जोड्या शोमध्ये एन्ट्री करणार आहेत. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होतोय.

यादरम्यान, सलमान खान त्याच्या टायगर 3 चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. या रविवारी सिनेमा प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी आहेत. दिग्दर्शक मनीश शर्मा दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्सद्वारे निर्मित हा एक धमाकेदार चित्रपट असणार आहे. सलमानचे चाहते याची आतुरतेनं वाट पाहात आहेत. गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सलमानच्या चाहत्यांचा उत्साह द्विगुणित करणारा होता. ट्रेलरमध्ये या चित्रपटाची वेगवान दृष्ये, आकर्षक स्टंट्स आणि अ‍ॅक्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सलमान आणि कतरिना कैफची ऑन स्क्रिन केमेस्ट्री चाहत्यांना वेड लावणारी होती.

ABOUT THE AUTHOR

...view details