मुंबई - सुपरस्टार सलमान खान बिग बॉस 16 च्या आगामी भागामध्ये मजा मस्ती करताना दिसणार आहे. बिग बॉसचा हा वीकेंड का वार अधिक मनोरंजक बनवण्यासाठी, कॅटरिना कैफ तिच्या फोन भूत सहकलाकार ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसह सेटवर पोहोचली होती.
कलर्स टीव्हीने लेटेस्ट एपिसोडचे अनेक प्रोमो रिलीज केले ज्यामध्ये कॅटरिना होस्ट सलमानसोबत चांगला टाईम घालवताना दिसत आहे. एका प्रोमोमध्ये सलमानने कॅटरिनाला सांगितले की, जर तो एखाद्या दिवशी भूत बनला तर त्याला तिचा नवरा, अभिनेता विकी कौशलची हेरगिरी करायला आवडेल.
कॅटरिनाने सलमानला विचारले की तो भूत बनला तर कोणाची हेरगिरी करायला आवडेल. यावर सलमानने उत्तर दिले, "एक बंदा है उसका नाम विक्कू कौशल है.''