महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sa Re Ga Ma Winner : 9 वर्षीय जेतशेन सारेगमापा लिटल चॅम्प्सची विजेती, जिंकले १० लाख रुपये

लिटल चॅम्प्सच्या अंतिम फेरीत हर्ष सिकंदर, राफा येस्मिन, अथर्व बक्षी, अतनु मिश्रा, जेतशेन डोहना लामा आणि ज्ञानेश्वरी घाडगे हे सहा स्पर्धक होते. या अव्वल सहा स्पर्धकांमधून जेतशेनने ट्रॉफी आपल्या नावे केली.

Jetshen Dohna Lama
जेतशेन डोहना लामा

By

Published : Jan 23, 2023, 7:47 AM IST

मुंबई : सिक्कीममधील पाक्योंग येथील नऊ वर्षीय जेतशेन डोहना लामा हिला 'सा रे ग मा प लिटल चॅम्प्स' या सिंगिंग रिअॅलिटी शोची विजेती घोषित करण्यात आले आहे. तिला 10 लाख रुपयेदेखील मिळणार आहेत. 15 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू झालेल्या या शोचा समारोप एका ग्रँड फिनालेसह झाला. या सोहळ्याला बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ, चित्रपट निर्माता अनुराग कश्यप आणि संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी उपस्थित होते.

लता मंगेशकर यांच्या आवाजाशी तुलना : लिटल चॅम्प्सच्या अंतिम फेरीत हर्ष सिकंदर, राफा येस्मिन, अथर्व बक्षी, अतनु मिश्रा, जेतशेन डोहना लामा आणि ज्ञानेश्वरी घाडगे हे सहा स्पर्धक होते. या अव्वल सहा स्पर्धकांमधून जेतशेनने ट्रॉफी आपल्या नावे केली. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील जेतशेनची प्रशंसा केली होती. त्यांनी तिच्या आवाजाची तुलना दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजाशी केली होती. जितशेनला जज शंकर महादेवन, अनु मलिक आणि नीती मोहन यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली. 9 वर्षीय हर्ष सिकंदर आणि 12 वर्षीय ज्ञानेश्वरी घाडगे यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळाला. एपिसोड दरम्यान, जॅकी श्रॉफने मंजिरा वाजवली तर अमित त्रिवेदी यांनी जेतशेनला स्टेजवर तिच्यासोबत 'परेशान' हे गाणे गाण्याची विनंती केली होती.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गायला सुरुवात : रॉक म्युझिकची मोठी चाहती असलेल्या जेतशेनने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणे गायला सुरूवात केली आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर, तिने तिचा स्पर्धेतील अनुभव शेअर केला. ती म्हणाली, 'हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. सर्वच स्पर्धक खूप प्रतिभावान असल्याने स्पर्धा कठीण होती. या स्पर्धेतून मला बरेच काही चांगले शिकण्यास मिळाले. मी माझ्या सर्व मार्गदर्शकांचे आभारी आहे ज्यांनी मला सतत पाठिंबा दिला आणि एक गायक म्हणून माझी क्षमता समजून घेण्यासाठी मला मदत केली.' ती शेवटी म्हणाली की, 'मी नक्कीच माझ्यासोबत आठवणींचा गठ्ठा घेऊन जात आहे आणि माझ्या नवीन गायन प्रवासाची वाट पाहत आहे.'

'इंडस्ट्रीत कारकीर्द घडवण्याची क्षमता' : जेतशेनच्या कामगिरीबद्दल भाष्य करताना शंकर महादेवन म्हणाले, 'जेतशेनने संपूर्ण हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रत्येक आठवड्यांनंतर तिच्या गायनात सुधारणा होत गेली. या सीझनमध्ये तिला गायिका म्हणून वाढताना मी खरोखर पाहिले आहे.' नीती मोहनने जेतशेनचे अभिनंदन करत म्हटले, 'मला संपूर्ण हंगामात तिची कामगिरी आवडली. मी तिच्या गायनाचा भरपूर आनंद लुटला. ती खरोखरच एक अष्टपैलू गायिका आहे आणि मला विश्वास आहे की तिच्यामध्ये इंडस्ट्रीत कारकीर्द घडवण्याची क्षमता आहे.' अनु मलिकने जेतशेनला शुभेच्छा दिल्या आणि म्हणाला, 'तिचे गाणे ऐकणे नेहमीच आनंददायक होते. या हंगामाच्या सुरुवातीपासूनच आम्ही तिला वाढताना पाहिले आहे. मला खात्री आहे की तिच्या पुढे एक उज्ज्वल भविष्य आहे.

हेही वाचा :Selfiee Trailer Out : अक्षय कुमार, इमरान हाश्मीच्या 'सेल्फीचा' ट्रेलर आऊट

ABOUT THE AUTHOR

...view details