मुंबई - आयएएस अतहर आमिर खानने सुंदर आणि ग्लॅमरस डॉक्टर मेहरीन काझीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अतहर आणि मेहरीन या दोघांची एंगेजमेंट पार पडली आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे. 2015 मधील IAS टॉपर टीना दाबीचा माजी पती आणि IAS अतहर आमिर खान पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. यापूर्वी अतहरची माजी पत्नी टीना दाबीने यावर्षी आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केले होते.
आता अतहर आमिर खान सुंदर आणि ग्लॅमरस डॉक्टर मेहरीनसोबत लग्न करणार आहे. अतहरची मंगेतर मेहरीन दिसण्यात अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर तिचे संपूर्ण ग्लॅमर असलेले सुंदर फोटो आहेत. श्रीनगरच्या लाल बाजार येथे राहणारी मेहरीन ही व्यवसायाने डॉक्टर असून ती दिल्लीच्या राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहे. मेहरीन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि इंस्टाग्रामवर तिला 2.4 मिलियन युजर्स फॉलो करतात.