मुंबई- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी दौऱ्यावर ( Prime Minister Narendra Modi's visit to Germany ) असताना त्यांना एका भारतीय मुलाने देशभक्तीपर गीत ( Patriotic song ) ऐकवले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला होता. या मुलाने सुरुवातीला पीएम मोदींसमोर 'हे जन्मभूमी भारत' हे गाणे ( boy singing in front of Prime Minister Modi ) गायले होते. मॉर्फ केलेल्या व्हिडिओमध्ये त्या मुलाच्या मूळ गाण्याच्या जागी, 'महंगाई डायन खाये जात है', हे गाणे बदलण्यात आले होते. हा व्हिडिओ कॉमेडियन कुणाल कामराने( Comedian Kunal Kamara ) ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर त्याच्या समर्थनार्थ व विरोधात प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.
कुणालवर विरोधकांनी भरपूर टीका केली. अशा प्रतिक्रियांचा सामना केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बर्लिन, जर्मनीमधील एका मुलाशी झालेल्या संवादाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ हटवला, जो त्याने यापूर्वी ट्विटरवर शेअर केला होता.
मुलाच्या वडिलांनी कॉमेडियन कुणाल कामराला "कचरा" (कचरा) असे म्हटले. मुलाचे वडील गणेश पोळ यांनी कामरा यांचे ट्विट रिट्विट केले की, "तो माझा 7 वर्षांचा मुलगा आहे, ज्याला हे गाणे आपल्या प्रिय मातृभूमीसाठी गाण्याची इच्छा होती."