मुंबई - Bigg Boss 17 day 96 highlights: जसजसा बिग बॉस 17 हा रिअॅलिटी टीव्ही शो संपण्याच्या मार्गावर आहे, तसतसे घरातील भांडणे अधिकच तीव्र होत आहेत. अवघे दोन आठवडे शिल्लक असताना, हा शो मोठ्या प्रमाणात गाजला आहे. गुरुवारच्या एपिसोडमध्ये पती-पत्नी जोडी विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात मन्नारा चोप्रावरून कडाक्याचं भांडण झाले.
अंकिता लोखंडेला विकी जैनने केले दुर्लक्षित - 96 व्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे, ईशा आणि विकीसोबत संवाद साधताना दिसली होती. त्यांच्याशी बोलताना ती म्हणाली, माझ्या सासूबाईंनी मला सांगितले होतं की विकी आणि मी भांडू नये. विकीने अंकिताकडे दुर्लक्ष केले आणि ईशाशी बोलणे चालू ठेवले आणि तिने आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. विकीला मग अंकिताने विचारले, "तुला ऐकायचे आहे की नाही?" विकी थंडपणे उत्तर देताना म्हणाला, "मी तुला टाळू शकत नाही, हा काय टोन आहे, तिसरी व्यक्ती इथे बसली आहे." त्यानंतर अंकिताने पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा विकीने हसण्यावर नेले. तो आपल्याकडे दुर्लक्ष करतोय या भावनेनं अंकिता लोखंडेला दुःख झालं आणि ती रडत खोलीतून निघून गेली.
विकीच्या कृत्यामुळे अंकिता असह्यपणे रडत राहिली. तिचं रडणं पाहून विकीने विचारले, "तू ओव्हर रिअॅक्ट का करतेस? कशासाठी एवढी ओव्हर रिऍक्शन?" यावर अंकिता तिच्या पाठीमागे तिच्याविषयी हसल्याबद्दल त्याला दोष देते. ती म्हणाली, "माझ्या पाठी मागे हसतोस, इतक्या लो कॉन्फीडन्सनं मी चालली आहे का?. मी माझा मुद्दा मांडायचा प्रयत्न करतेय आणि तू माझ्या माघारी हसतोस?"
विकी जैनने केला मन्नारा चोप्राचा बचाव - मन्नाराला ती शेवटच्या आठवड्यात येण्यास पात्र आहे असे सांगितल्यानंतर अंकिताचा विकीशी संघर्ष झाल्याचं पाहायला मिळाले. अंकिता, ईशा आणि आयशा मन्नारावर चर्चा करताना दिसले, पण विकीला ते आवडले नाही. त्यांनी सांगितले की ते या विषयावर सतत चर्चा करत आहेत आणि त्यांना ते आवडत नाही. विकी मन्नाराबद्दल बचावात्मक बनत आहे असे तिला वाटत असल्याने अंकिता चिडली.