महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bigg Boss 17 day 33 highlights: अंकिता लोखंडे गरोदर असल्याची चिंता, बिग बॉसमध्ये रंगलं नवं नाट्य - अंकिता लोखंडे विरुद्ध घरातील सदस्य

Bigg Boss 17 day 33 highlights: बिग बॉसच्या 17 व्या पर्वातील बुधवारच्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे विरुद्ध घरातील सदस्य एकत्र आल्याचं दिसलं. अंकितासाठी हा दिवस कठीण होता कारण तिला देखील गर्भवती असल्याची भीती वाटत होती. अनेक नाट्यमय गोष्टी या भागात घडल्या.

Bigg Boss 17 day 33 highlights
बिग बॉसमध्ये रंगलं नवं नाट्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 11:15 AM IST

मुंबई - Bigg Boss 17 day 33 highlights: बिग बॉसच्या 17 व्या पर्वाचं घरं म्हणजे एक रंगमंच बनलाय आणि अनेक इरसाल नाट्यं इथं प्रेक्षकांना पाहायला मिळाताहेत. या घरातील स्पर्धकांचा 33 वा दिवस अनेकमनोरंजक नाट्यमय प्रवेशांचा होता.

बिग बॉस 17 च्या घरात नाटक आणि अस्सल भावनांच्या रोलर कोस्टर राईडसह आणखी एक दिवस उलगडला. बुधवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्क दाखवण्यात आलं, ज्यमुळं संपूर्ण घराला धक्का बसला. हा दिवस उत्साह आणि तणावाने भरलेला होता. घरातील सदस्यांनी अंकिताच्या विरोधात बदला घेण्याचा प्रयत्न केला आणि तिला नॉमिनेट केलं. दरम्यान तिला मासिक पाळी चुकल्यामुळे मूड स्विंग्सचा सामना करावा लागला.

अंकिता लोखंडेला बसला नॉमिनेशनचा फटका - बुधवारच्या भागाची सुरुवात एका आकर्षक नॉमिनेशनच्या कार्यानं झाली. यापूर्वी अंकिताला तिच्या पसंतीच्या तीन स्पर्धकांना काढून टाकण्याचा विशेषाधिकार देण्यात आला होता. तिने एका आठवड्यापूर्वी या शक्तीचा वापर केला होता. याचा बदला आठवड्यात ऐश्वर्या शर्मा, मुनावर फारुकी आणि मन्नारा चोप्रा यांनी या आठवड्यात घेतलाय. यावेळी अंकिताला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलंय.

मुनावर फारुकी आणि मन्नारा चोप्रा यांनी अंकिता लोखंडेला आपलं टारगेट केलं. तर मन्नारा हिनं खानजादीला नामांकित केले. याशिवाय, अंकिता आणि विकीनं नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांना नॉमिनेट करण्यासाठी निवडलं. समर्थनं मन्नाराला नॉमिनेट केलं आणि ईशाने खानजादी आणि तहलकाचे नामांकन निवडलं. दुसरीकडे अभिषेकने अंकिताची निवड केली. अखेरीस अरुण श्रीकांत महाशेट्टीनं अंकिता आणि खानजादीचं नाव घेतलं. टास्कच्या शेवटी, अंकिता, सना, सनी आणि अरुण हे अंतिम नामांकित स्पर्धक म्हणून दिसले. मात्र, 'दिमाग' गृहातील सदस्यांनी आपली शक्ती वापरून अभिषेकचा यादीत समावेश केला.

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना- अंकिता लोखंडे आणि विकी जैनची अवस्था तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना या म्हणीसारखी झालीय. नामांकनानंतर विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात जोरदार वादावादी झाली. हा संघर्ष सना आणि अभिषेकच्या पूर्वीच्या मतभेदा नंतरचा भाग होता. विकी आणि अंकिता या समस्येचे निराकरण करण्यासाठी बसले असताना अंकितानं मासिक पाळी आणि संभाव्य गर्भधारणेबद्दल तिची चिंता व्यक्त केली. मात्र, विकी खेळावर चर्चा करण्यात मग्न होता, त्यामुळे अंकिताची अस्वस्थता वाढली. हे जोडपे एकमेकांवर नाराज दिसले, परंतु त्वरीत त्यांचे मतभेद सोडवले आणि एकमेकांची मस्करी केली.

समर्थ जुरेल - ईशा मालवीय यांच्यात भांडणात- समर्थ आणि ईशा यांनी अभिषेक कुमारला नॉमिनेट करण्यासाठी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आणखी एका वादात सापडले. ईशाने एकदाच तिची खेळातील भूमिका स्पष्ट केली आणि समर्थांना हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला

अभिषेक कुमारला फ्लर्ट करताना दिसली मन्नारा चोप्रा- मन्नाराने अभिषेकसोबत फ्लर्ट करून खानजादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. या हावभावामुळे खानजादीला अस्वस्थ वाटू लागले आणि अभिषेकने स्वतःला मन्नारापासून दूर ठेवण्यास भाग पाडलं. परंतु, खानजादी नाराजच राहिली आणि अभिषेकने तिचे सांत्वन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. खानजादीची समजूत घालण्यासाठी अभिषेकने नियम झुगारून तिला चॉकलेट दिलं.

हेही वाचा -

1. Nana Patekar Apology: तो सीनचा एक भाग होता, पण मार खाणारा दुसराच निघाला : नाना पाटेकरचा माफीनामाAnushka Sharma Showers 2. Praises Virat Kohli : 'विराट' पराक्रमानंतर अनुष्काची खास पोस्ट, पतीचं केलं भरभरून कौतुक

3.Srk Diwali Celebration With K Jo : शाहरुख आणि करण जोहरचे अलिबागमध्ये दिवाळी सेलेब्रिशन, लीक फोटोमुळे सोशल मीडियावर वादळ

ABOUT THE AUTHOR

...view details