मुंबई - 'बिग बॉस'चं घर कायम अशांत असतं. तंटे, आरोप प्रत्यारोप, गॉसिपिंग, आक्रमकता, रहस्यभेद अशा असंख्य गोष्टी इथं एकाचवेळी समांतरपणे सुरू असतात. प्रेक्षकही हा सारा प्रकार पाहून स्वतःचं मनोरंजन करुन घेतात. 'बिग बॉस'च्या 17 व्या सिझनला सुरुवात होऊन 23 दिवस पूर्ण झालेत. 23 वा दिवस नामांकन आणि जोरदार वादविवादाचा होता. सलमान खानचा रिअॅलिटी शो दिवसेंदिवस अधिकच वेधक बनत चालला असून चाहते शोमधील नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण घटकांची प्रशंसा करण्यात मग्न झाले आहेत.
अरुण महाशेट्टीवर मुनावर फारुकीचा आरोप
एपिसोड शांतपणे सुरू असताना 'दिमाक' टीमचं अन्न चोरला जाऊ शकतं, या कारणावरुन हस्तक्षेप करायला सुरुवात केल्यानंतर घरातील शांतता भंग पावली. त्याचवेळी मन्नारा चोप्राच्या ध्यानात आलं की, टोपलीतून काही रोट्या गायब झाल्या आहेत. त्यानंतर मुनावरनं दमरुममध्ये एन्ट्री केली आणि अरुणसोबत भांडण उकरुन काढलं.
अरुण महाशेट्टीला शोमधून बाहेर पडण्याची इच्छा
मुनावरनं भांडताना केलेल्या आरोपामुळे अरुण महाशेट्टी खूप दुखावला. सोमवारी एपिसोडच्या अखेरीस तो म्हणाला की, इथं राहणं बाहेरील जीवनापेक्षा खूप कठीण आहे आणि तो आता घाबरलाय. अशा तणावाच्या परिस्थितीत काही नियम मोडले जातील, अशी भीती अरुणला वाटतेय. त्यामुळे त्यानं शो सोडण्याचा विचार बोलून दाखवला. स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीच्या बोलण्यानं त्याचा अहंकार दुखावल्यानं शोमधून बाहेर जाणार असल्याचा तो म्हणाला.
ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्टमध्ये शाब्दिक चकमक
ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, अंकिता लोखंडे आणि ईशा मालवीय चोरीला गेलेला किराणा सामान लपवण्याचा प्रयत्न करत असताना या माजी जोडप्यात खटका उडाला. सामान बॅग आणि कंटेनरमध्ये भरण्यासाठी घाई करत असताना नील आणि ऐश्वर्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. नंतर नीलनं ऐश्वर्याची माफी मागून मामला पटकन मिटवला.
नील भट्टच्या नॉमिनेशन नंतर रंगलं नाट्य
वादग्रस्त नामांकनांमुळे एपिसोडला अचानक विचित्र वळण मिळालं. 'बिग बॉस'ने या प्रक्रियेसाठी पहिल्यांदा 'दिल' हाऊसच्या सहभागींना बोलावलं ज्यामध्ये सदस्यांना गटातील एखाद्याला प्रपोज करायचं होतं आणि त्यांना नॉमिनेशन करण्याचे कारण स्पष्ट सांगायचं होतं. अंकिताने नीलच्या नॉमिनेशनवर नाराजी व्यक्त केल्यानं नाट्याला सुरूवात झाली. नीलने अंकिताशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती अ अधिक बिघडत गेली. ऐश्वर्या आणि विकी त्यांच्या जोडीदाराचा बचाव करताना दिसले आणि या दरम्यान ऐश्वर्या भडकली आणि अंकिताला 'चुडैल' म्हणाली. 'दिल' हाऊसमधील नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा आणि अंकिता लोखंडे यांना या आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.
दम आणि दिमाग घरांचेनॉमिनेशन
तहलका आणि अरुणने अनुराग आणि समर्थ यांची निवड केली, तर अनुराग आणि समर्थने तहलका आणि अरुण यांना निवडलं. सना वगळता 'दम' घरातील प्रत्येक सदस्याला नॉमिनेट करण्यात आलं होतं. रिंकूने दिमाग घरच्या घरातून खानजादी, नवीद सोले आणि मन्नारा यांची निवड केली, तर जिग्ना व्होरानं मन्नारा आणि नवीद यांना निवडलं. मुनावरनं नावेद आणि खानजादी यांना नॉमिनेशनसाठी प्रपोज केलं, तर नावेदने मुनावर आणि रिंकू यांना प्रपोज केलं. मन्नारानं रिंकू आणि खानजादीची निवड केली, ज्यामुळे नावेद आणि मन्नारा यांना दिमाग घरातून नामांकन मिळालंय.
मुनावर फारुकी आणि मन्नारा चोप्राचं नातं
मुनावर फारुकीनं बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये मन्नारा चोप्रा सोबतची त्याची रिलेशनशिप स्पष्ट केली. मन्नारानंही मुनावरची बोलण्याची स्टाईल आवडत असल्याचं सांगितलं. आपल्या नात्यात आकर्षण किंवा इश्कबाजी नसून कवळ मैत्री असल्याचंही मुनावरनं स्पष्ट केलं.
हेही वाचा -
1. Rashmika Mandanna : मॉर्फ व्हिडिओवर रश्मिका म्हणाली, तंत्रज्ञानाचा गैरवापर भयानक
2.Trailer Date Out : विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'चा ट्रेलर होणार 'या' तारखेला रिलीज
3.Koffee With Karan: शुभमन गिलशी डेटिंगच्या प्रश्नावर सारा अली खाननं पहिल्यांदाचं सोडलं मौन