महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Archana Gautam in Meerut : बिग बॉस फेम अर्चना गौतम आज मेरठला पोहचणार, चाहत्यांना भेटायला येण्याचे केले अपील - अर्चना गौतम बिग बॉस

बिग बॉस 16 नंतर चर्चेत आलेली अर्चना गौतम रविवारी मेरठला तिच्या घरी जाणार आहे. या वेळी तिने व्हिडिओ शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना भेटायला येण्याचे आमंत्रण दिले आहे.

Archana Gautam
अर्चना गौतम

By

Published : Feb 19, 2023, 10:59 AM IST

अभिनेत्री अर्चना गौतम

मेरठ (उ. प्रदेश) : रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 16 ची तीसरी रनर अप असलेली अभिनेत्री अर्चना गौतम रविवारी मेरठ या तिच्या मूळ गावी पोहोचणार आहे. अर्चनाने एक व्हिडिओ जारी करत सांगितले की, ती रविवारी दुपारी 12 वाजता मुंबईहून दिल्ली विमानतळावर पोहोचेल. यानंतर ती मेरठला जाणार आहे.

मुंबई टू मेरठ व्हाया दिल्ली : अभिनेत्री अर्चना गौतमने व्हिडिओमध्ये सांगितले की, ती विमानाने आधी मुंबईहून दिल्लीला येईल. त्यानंतर दिल्लीहून रस्तामार्गे मेरठला पोहोचेल. या दरम्यान ती दिल्ली एनसीआर आणि हरियाणातील तिच्या चाहत्यांना भेटेल, जे तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री म्हणाली की ती मेरठच्या आयआयएमटी अभियांत्रिकी महाविद्यालयात जाणार आहे. सर्वांनी येथे पोहोचावे आणि तिला महाविद्यालयात भेटावे.

चाहतेही सोबत असतील : अर्चना गौतमच्या वडिलांनी आपली मुलगी वाया रोड मेरठला येत असल्याची माहिती देत ​​सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची पोलिसांकडे मागणी केली होती. तिच्या वडिलांनी सांगितले की, अर्चना दिल्ली गेटवरून मोहन नगरला पोहोचेल आणि तेथून मुरादनगर, मोदीनगरमार्गे मेरठला जाईल. या दरम्यान तिचे चाहतेही अर्चनासोबत असतील. अर्चना प्रथम परतापूर, बागपत अड्डा, बेगमपुल, कचारी मार्गे आंबेडकर चौकात पुष्पहार घालतील आणि त्यानंतर सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधतील.

कॉंग्रेसची उमेदवार राहिली आहे : अर्चना गौतम 2022 मध्ये मेरठच्या हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान अर्चना गौतमला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मेरठमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. 27 वर्षीय अर्चना गौतमने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही रोल केले आहेत. अर्चनाने 2015 सालच्या ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय तिने श्रद्धा कपूर स्टारर हसीना पारकर आणि बरोटा कंपनी या चित्रपटांमध्येही काम केले आहे. अर्चनाने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने मिस बिकिनी इंडिया 2018 चा किताबही जिंकला आहे. अर्चनाच्या फॅन फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. अर्चना बिग बॉस 16 मध्ये खूप चर्चेत राहिली होती. मात्र, ती टॉप 3 मधून बाहेर पडली.

हेही वाचा :Bigg Boss Season 16 : स्पर्धक अर्चना गौतमचे वडील भिंतींवर लावत आहेत पोस्टर! लोकांना मतदान करण्याची अपील

ABOUT THE AUTHOR

...view details