अभिजित बिचुकले यांचे अफाट, बेफाट आणि अतरंगी मनोरंजन, ‘किचन कल्लाकार’ मध्ये! - अभिजित बिचुकले बातमी
अभिजित बिचुकले आता कल्ला करणार आहेत किचन कल्लाकारच्या किचनमध्ये. अभिनेता जयवंत वाडकर आणि तृप्ती देसाई यांच्याबरोबर अभिजित बिचुकले यांची पाककलेची चुरस रंगणार आहे. नेहमीच वादाच्या गराड्यात अडकले बिचुकले पाककलेचे कसोटीत अव्वल ठरणार का? किचन कल्लाकारचा किताब बिचुकले यांना मिळणार का याकडे प्रेक्षकाचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई - किचन आणि कलाकार हे शक्यतो न जुळणारं रसायन. परंतु काही कलाकार उत्तम स्वयंपाक बनवितात आणि काहींना पाणीदेखील उकळवता येत नाही. झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय.
बिचुकले टीव्हीवर येऊन कल्ला करणार - अभिजित बिचुकले हे नाव प्रेक्षकांना काही नवीन नाही. बिचुकले हे नाव समोर आलं की सगळ्यात पहिला डोक्यात विचार येतो तो म्हणजे अफाट, बेफाट आणि अतरंगी मनोरंजन. बिचुकले यांचे व्यक्तिमत्व हे प्रेक्षकांना रंजकपणे कोपरखळी देणारं आहे. बिचुकले टीव्हीवर आले कि ते आता काय कल्ला करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. लवकरच बिचुकले टीव्हीवर येऊन कल्ला करणार आहेत.
पाककलेची चुरस रंगणार -अभिजित बिचुकले आता कल्ला करणार आहेत किचन कल्लाकारच्या किचनमध्ये. अभिनेता जयवंत वाडकर आणि तृप्ती देसाई यांच्याबरोबर अभिजित बिचुकले यांची पाककलेची चुरस रंगणार आहे. नेहमीच वादाच्या गराड्यात अडकले बिचुकले पाककलेचे कसोटीत अव्वल ठरणार का? किचन कल्लाकारचा किताब बिचुकले यांना मिळणार का?
किचन कल्लाकार चा हा भाग प्रसारित होणार आहे येत्या १५ जून रोजी रात्री ९.३० वाजता झी मराठीवर.