महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Zinda Banda Song Trolled : 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाण्यावर भडकले ट्रोलर्स, अनेक गोष्टींवर आक्षेप - जिंदा बंदा गाणे

शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'जवान' हा लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील पहिले गाणे आज रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर सध्या खूप ट्रोल केले जात आहे.

Zinda Banda Song Trolled
जिंदा बंदा गाणे झाले ट्रोल

By

Published : Jul 31, 2023, 4:32 PM IST

मुंबई : शाहरुख खान स्टारर आगामी 'जवान' चित्रपटातील पहिले गाणे 'जिंदा बंदा' आज ३१ जुलै रोजी प्रदर्शित झाले. शाहरुखच्या चित्रपटातील पहिल्या गाण्याची चाहते खूप आतुरतेने वाट पाहत होते. 'जिंदा बंदा' या गाण्यात शाहरुख खान खूपच देखणा दिसत असून तो खूप खास डान्स करत आहे. मात्र 'जवान' चित्रपटातील हे गाणे काही चाहत्यांना पसंतीस पडले नाही. या गाण्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. 'जिंदा बंदा' गाण्याला दक्षिणेतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्धने गायले असून या गाण्याला त्यानेच संगीतबद्ध केले आहे.

'जिंदा बंदा' गाणे :शाहरुख खानवर अनिरुद्धचा आवाज जुळत नसल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. याशिवाय या गाणेचे बोल देखील चाहत्यांना आवडले नाही आहेत. त्यामुळे गाण्याला फालतू असल्याचे चाहते म्हणत आहेत. एका यूजरने गाण्याला ट्रोल करत लिहले, 'जिंदा बंदा' 'गाणे ठिक आहे मात्र हे गाणे ट्रोल करण्याच्या लायकीचे नाही. त्यामुळे टायगर ३वर अधिक चांगले फोकस करा'. तर दुसऱ्या एका यूजरने लिहले, 'काय गाणे बनवले आहे. मी तर या गाण्याला ट्रोल करणार होतो, मात्र हे गाणे ट्रोलिंगपेक्षा जास्त आहे'. आणखी एक युजर लिहले, 'किती बकवास गाणे आहे, 'किसी का भाई किसी जान'मधील छोटू मोटू गाणे यापेक्षा चांगले आहे, मी कसे ट्रोल करू, मला हे गाणे ऐकावेसेही वाटत नाही'. अशा अनेक प्रकारच्या कमेंट या गाण्याच्या पोस्टवर येत आहे. या गाण्याचे बोल बदलल्यानंतरही यूजर्स संतापले आहेत. 'तन मन गंगा रे जिंदा बंदा हो' या गाण्याच्या ओळींना बकवास म्हटले आहे.

शाहरुखने म्हटले धन्यवाद : शाहरुख खानने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, जिथे ज्योत आहे तिथे तत्त्वांवर मारा करणे आवश्यक आहे, जर जिवंत असेल तर जिवंत दिसणे आवश्यक आहे. तसेच या ट्विटमध्ये शाहरुख सर्वांना धन्यवाद म्हटले आहे. 'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण कुमार उर्फ अ‍ॅटलीने केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त, विजय सेतुपती, प्रियामणी आणि दंगल गर्ल सान्या मल्होत्रा हे देखील कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Ghoomer: 'मेलबॉर्न फिल्म फेस्टिव्हल'मध्ये होणार 'घुमर'चा प्रीमियर, मोशन पोस्टर रिलीज
  2. Dream Girl 2 Teaser : 'ड्रीम गर्ल २' चा दिलखेचक टीझर रिलीज, ट्रेलरची प्रतीक्षा सुरू
  3. Raghava Lawrence shares first look : 'चंद्रमुखी २' मधील राघव लॉरेन्सचा 'वेट्टय्यान राजा' फर्स्ट लूक प्रसिद्ध

ABOUT THE AUTHOR

...view details