महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ZHZB Collection Day 25 : 'जरा हटके जरा बचके'ने बॉक्स ऑफिसवर रोवला विजयाचा झेंडा - 80 crore

विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर चित्रपट 'जरा हटके जरा बचके'ने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. जाणून घ्या, २५ दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई किती झाली आहे.

ZHZB Collection Day 25
जरा हटके जरा बचके कलेक्शन दिवस 25

By

Published : Jun 27, 2023, 2:16 PM IST

मुंबई : विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर चित्रपट 'जरा हटके जरा बचके' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित झाला होता आणि आज २६ जून रोजी रिलीजच्या २६ व्या दिवशी तो चालू आहे. या चित्रपटाने २५व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि चित्रपटाचे कलेक्शन ८० कोटींच्या पुढे नेले आहे. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या यशामुळे निर्मात्यांचे चेहरे आनंदी झाले आहे. त्यामुळे त्यांनी अधिकृत अकाउंटवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन शेअर केले आहे. या, चित्रपटाने ५.५० कोटींची ओपनिंग केली होती आणि आतापर्यंत चित्रपटाची कमाई कोटींच्या आकड्यात आहे.

२५ व्या दिवसाच्या कमाईने काय केले आश्चर्य: विक्की कौशल आणि सारा अली खान यांच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने २५ व्या दिवशीही कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या २५ व्या दिवशी १ कोटी रुपयांची कमाई केली असून, चित्रपटाचे एकूण कलेक्शन ८०.०१ कोटी रुपये झाले आहे. ४० कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाने २५ व्या दिवशी दुप्पट कमाई करून चांगली कामगिरी केली आहे.

चित्रपटाची कहाणी : या चित्रपटाची कहाणी एका मध्यमवर्गीय विवाहित जोडप्याच्या प्रव्हिसीवर आधारित आहे. या चित्रपटात विक्की आणि साराने फार चांगला अभिनय केला आहे. प्रेक्षकांनाही यांच्यातील केमेस्ट्री फार आवडली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. लक्ष्मणने याआधी कृती सेनॉन आणि पंकज त्रिपाठीसोबत मिमी हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. लक्ष्मणने मिमी हा चित्रपट २० कोटींमध्ये बनवला आणि या चित्रपटाने ३५ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. आता 'जरा हटके जरा बचके'ने देखील बॉक्स ऑफिसवर डब्बलची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते फार खूश आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या फार पसंतीला उतरला आहे. त्यामुळे आता देखील या चित्रपटाला बघायला प्रेक्षक जात आहे. रूपेरी पडद्यावर या चित्रपटाने फारच कमालीची कामगिरी केली आहे.

हेही वाचा :

  1. Kanimozhi ticket controversy : कमल हसन यांनी कोईम्बतूरच्या पहिल्या महिला बस चालकाला भेट दिली कार
  2. Tamannaah gets emotional : चाहत्याच्या हातावर आपल्या चेहऱ्याचा टॅटू पाहून भावूक झाली तमन्ना भाटिया
  3. YouTuber Devraj Patel : 'दिल से बुरा लगता है भाई' फेम युट्यूबरचे अपघाती निधन

ABOUT THE AUTHOR

...view details