मुंबई:अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर अभिनीत स्पाय थ्रिलर वॉर 2 साठी आदित्य चोप्राने अभिनेत्री कियारा अडवाणीची निवड केली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित, यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील आगामी चित्रपटात एड्रेनालाईन-पंपिंग अॅक्शन असणार आहे. शिवाय या चित्रपटात हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात जबरदस्त वॉर दाखविल्या जाणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार 'यशराज फिल्म (YRF) स्पाय युनिव्हर्स आणि वॉर 2मध्ये कियारा अडवाणीला घेणाचा विचार करत आहे. 'यशराज फिल्म' स्पाय युनिव्हर्समध्ये 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर' आणि 'पठाण' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. या फ्रँचायझीकडून येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या अपेक्षा या आता वाढत जाणार आहे. कारण या चित्रपटानी रूपेरी पडद्यावर पुर्वी फार धुमाकुळ घातले होते. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. मात्र सध्याला कियारा ही टॉपवर आहे त्यामुळे आदित्य चोप्राने तिला वॉर 2 साठी साईन केल्याच्या बातम्या समोर येत आहे. वॉर 2 या चित्रपटात हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी सारखे तीन सुपरस्टार आहेत! या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस्वी तरुण आणि अयान मुखर्जी करत आहे. आदित्य चोप्रा आता सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट बनवणार आहे. कियाराला अयान आणि आदित्य वॉर 2 साठी पडद्यावर कसे सादर करतात हे पाहणे खरोखरच रोमांचक असणार आहे.